*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बार्शी तालुक्यामध्ये नेमलेल्या मराठा सेवकांची बैठक प्रत्येक महिन्यामध्ये एका गावात होणार असून या बैठकीमध्ये मराठा समाजातील ग्राहक जागरूक करणे मराठा समाजातील तरुणांना व्यापारासाठी प्रवृत्त करणे उद्योग व्यवसाय निर्माण करणे यासाठी गावोगावी मराठा समाजाच्या बैठका बार्शी तालुक्यात चालू आहेत इथून पुढच्या काळात आरक्षणाच्या लढ्यासोबत समाज आर्थिक मजबूत करणे त्याचबरोबर शिक्षणामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे समाज निर्व्यसनी करणे या कामावरती भर दिला जाणार आहे त्याचाच भाग म्हणून बार्शी तालुक्यातील प्रत्येक समाज बांधवांना जागरूक करण्याचे काम या बैठकांच्या माध्यमातून होणार आहे मराठा सेवक असं जरी नाव प्रत्येकाला दिला असले तरी कोणत्याही जातीच्या व समाजाच्या अडीअडचणी मराठा सेवकांनी सोडवायच्या अशा सूचना सुद्धा प्रत्येक मराठा सेवकाला दिल्या जात आहेत मराठा सेवक आणि जाती आणि धर्मामध्ये सलोखा निर्माण करायचा, त्याचबरोबर प्रत्येक गावातील मराठा सेवक हा ह्या गावातील सर्व गोरगरीब समाजाचा नोकर असेल तो कोणाचाही मालक असल्यासारखा वागणार नाही मराठा सेवकाच्या हातून तुम्ही सांगितलेले प्रत्येक काम होण्यासाठी तो सदैव प्रयत्नशील असेल सामान्य जनतेने मात्र त्यांच्याशी संपर्क साधावा अशा बैठकीमध्ये सूचना बार्शी तालुक्याचे मराठा नेते आनंद काशीद यांनी यावली येथील बैठकीमध्ये केल्या.
या हनुमान मंदिर यावली या ठिकाणी झालेल्या बैठकीचे वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन सौ सुनीता चव्हाण यांच्या हस्ते झाले तर या बैठकीसाठी मराठा सेवा संघ वैराग चे अध्यक्ष धनराज गरड भीमराव गंडुरे शेंद्री निलेश डोईफोडे प्रमोद डोईफोडे सुरडी अभिजीत मोरे घाणेगाव मधुकर डुरे इरले पंकज सरकाळे इरलेवाडी, दादासाहेब जाधव तडवळे, कृष्णा कदम उंडेगाव, गंगाराम काकडे सचिन शिरसागर अतुल काकडे विश्वनाथ शिंदे वसुदेव सर्वदे हे उपस्थित होते.
यावेळी परमेश्वर फसले यांची यावली मराठा सेवक पदी निवड आनंद काशीद यांनी घोषित केली तर ईश्वर पोकळे यांना बार्शी तालुका कार्यकारणी मध्ये निवड करण्यात आली
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावलीतील अतुल शिंदे तुकाराम ताटे दत्तात्रेय मार्कड काशिनाथ शिंदे महादेव चव्हाण भारत साठे अतुल उकरंडे शुभम लोखंडे भास्कर काळे सुनील काळदाते अभिजीत उकरंडे यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन शिरसागर यांनी केले तर आभार किरण उबाळे यांनी व्यक्त केले
सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीमध्ये समाजातील विविध प्रश्नावरती चर्चा झाली इथून पुढच्या काळामध्ये समाजाचा कोणताही प्रश्न असू द्या त्याची तात्काळ सोडवणूक होईल असा विश्वास या बैठकीच्या वेळी मराठा सेवकांना जरांगे पाटलांच्या वतीने देण्यात आला
मराठ्यांचा समाजाचे ग्राहक बाजारपेठेतील केंद्र बिंदू असून त्याची चांगली मोट बंधू व त्याचा फायदा मराठा समाजाला कसा होईल यासाठी इथून पुढच्या काळात मोठी चळवळ उभा करण्याचा आनंद कशी त्यांनी यावेळी आगळीवेगळी संकल्पना व्यक्त करत मूर्त रूप देण्यासाठी प्रोग्राम ठरवल्याचं जाहीर केले
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा