Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २० एप्रिल, २०२५

*सोमनाथ सुरवसे या पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडून प्रशस्तीपत्र..*

 


*ज्येष्ठ पत्रकार-- राजूभाई मुलाणी

करणी -भानामती काढून तुमची सर्व दुःख दूर करतो असे सांगून १ लाख ७६ हजार रुपयांचे दागिने लबाडीने चोरून नेलेल्या आरोपींना सोलापूर रेल्वे स्टेशन वर तत्काळ पकडल्याबद्दल सोमनाथ नेताजी सुरवसे यांच्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना सोलापूरचे पोलीस आयुक्त एम . राज कुमार यांच्याकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यातआले आहे .

याबाबत अधिक वृत्त असे की ,नगीना मोहम्मद अरिफ (वय ३७ ) व अबिद रशीद (वय ५५ ) दोघेही राहणार गाजियाबाद -उत्तर प्रदेश हे सोलापूर येथील सदर बाझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेच्या घरी आले . जादूटोणा करून तुझे सारे दुःख करून करणी धरणीच्या माध्यमातून तुला सुखी करतो असे सांगत त्या महिलेची दिशाभूल केली .त्या महिलेला आपल्या जवळील १ लाख ७६ हजार किमतीचे २२ ग्रॅम सोने आणण्यास सांगितले .ते सोने एका गाठोड्यात बांधून तिच्यावर हळदी -कुंकू व इतर पावडर टाकून तिच्याभोवती पणत्या लावण्यात आल्या . हे सोने रात्री बारा वाजण्याच्या आधी उघडायचे नाही असे त्या महिलेला बजावले .महिलेला गप्पांमध्ये गुंतवत त्या गाठोड्यातून सर्व सोने काढून त्या दोघांनी पोबारा केला .रात्री दहा वाजता महिलेने गाठोडे उघडून पाहिले तर सोने गायब होते व ते दोन्ही आरोपीही गायब होते त्यावेळी संबंधित महिलेने सदर बाजार पोलीस ठाण्यात धाव घेतली .सोलापूरचे पोलीस आयुक्त एम . राज कुमार ,पोलीस उपायुक्त विजय कबाडे ,पोलीस निरीक्षक अजित लकडे ,पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सोमनाथ सुरवसे, राजेश चव्हाण , सागर सरतापे आणि सागर गुंड या चार कर्मचाऱ्यांचे पथक तपासासाठी नेमले . या पथकाने केवळ चार तासाच्या आत गाजियाबादच्या त्या महिलेस व पुरुषाला सोलापूर रेल्वे स्टेशन मधून अटक केली व त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त केला .कसलाही पुरावा अथवा आरोपींचे छायाचित्र नसताना या चार पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ या गुन्ह्याचा तपास लावल्यामुळे सोलापूरचे पोलीस आयुक्त एम . राज कुमार यांच्या हस्ते चौघांना विशिष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले .सोमनाथ सुरवसे हे महाळुंग गट नंबर २ ता . माळशिरस येथील रहिवासी आहेत .त्यांचे गावात कौतुक केले जात आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा