*श्रीपूर---बी.टी.शिवशरण.
श्रीपूर मधील प्रभाग क्रमांक सोळा च्या नगरसेविका व सभापती असलेल्या सौ नाजिया पठाण व त्यांचे पती मोहसीन पठाण हे नेहमीच दरवेळी आगळा वेगळा उपक्रम राबवून सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक वैचारिक कार्यक्रमात चर्चेत राहिलेल एक सर्वमान्य व सुसंस्कृत दांपत्य म्हणून माळशिरस तालुक्यात नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात त्यांचे नाव आदराने घेतले जाते मोहिते पाटील घराणे यांचेवर निस्सीम श्रद्धा व भक्ती असलेलं हे कुटुंब आहे मोहसीन पठाण यांनी नेहमीच श्रीपूर मध्ये त्यांच्या वार्डातील अनेक समस्या सोडवण्यासाठी पहिल्यापासून प्रामाणिक प्रयत्न केले आहेत अनेक वेळा पदरमोड करून अनेकांना सहकार्य केले आहे तसेच वार्डातील स्वच्छता साफसफाई मुरुम टाकणे असो रस्त्यांचा प्रश्न असो त्यात त्यांनी नगरपंचायतचे माध्यमातून विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली आहे श्रीपूर मधील सेक्शन नऊ चा गोठा येथील हनुमान मंदिर आहे या जागृत हनुमान यांचे वर त्यांची मनोभावे श्रध्दा आहे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान मंदीरात भक्तीभावाने पुजा आरती प्रसाद वाटप केले जाते गेल्या चारपाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मशिदींवरील भोंगे काढा म्हणून वातावरण चिघळवले जात होते तर त्याच दरम्यान श्रीपूर मध्ये एक मुस्लिम कुटुंब हनुमान मंदीरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरी करून नगरसेविका असलेल्या नाजिया व त्यांचे पती मोहसीन पठाण या उभयतांचे हस्ते हनुमानाची आरती करण्यात आली तसेच सर्व उपस्थितांना महाप्रसाद वाटप करण्यात आला दरवर्षी हनुमान जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करून दरवेळी अध्यात्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते नामांकित किर्तनकार यांचं किर्तन भारुड तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप होते अडचणीतील व गरजू व्यक्तींना वैद्यकीय उपचारासाठी सहकार्य केले जाते या वर्षी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पठाण यांनी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला आहे भरघोस बक्षीस ठेवण्यात आली आहेत संध्याकाळी सात वाजता होम मिनिस्टर कार्यक्रम सुरू होणार आहे या कार्यक्रमाची उत्सुकता श्रीपूर महाळुंग बोरगाव मिरे उंबरे जांबूड माळखांबी काळेवाडी परिसरातील महिलांना लागली आहे गेल्या आठवड्यापासून समस्त महिला होम मिनिस्टर कार्यक्रमात काय बोलायचं कोणता प्रश्न विचारला तर काय उत्तर द्यायचे उखाणे ओवी गाणी यांची तयारी करत असल्याचे वातावरण तयार झाले आहे सौ नाजिया व मोहसीन पठाण यांचे या पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे या भागात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यामुळे सर्वत्र उत्सुकता आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा