Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३० एप्रिल, २०२५

*श्रीपुर येथील आंबेडकरी चळवळीतील शेवटचा शिलेदार "बबनराव वजाळे "गुरुजी यांचे निधन*

 


*श्रीपूर --प्रतिनिधी*

श्रीपूर मधील आंबेडकरी चळवळीतील सामाजिक राजकीय नेतृत्व केलेले माजी मुख्याध्यापक बबनराव एकनाथ वजाळे गुरुजी वय 90यांचे आज सकाळी नऊ वाजता वार्धक्याने निधन झाले आहे त्यांच्या पश्चात पत्नी सात मुले एक मुलगी नातवंडे पणतू असा परिवार आहे ते जिल्हा परिषद शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून त्यांनी सुमारे बत्तीस वर्षे त्यांनी सेवा बजावली आहे वजाळे गुरुजी हे नाव माळशिरस तालुक्यात सुप्रसिद्ध आहे लोकनेते स्वर्गीय मोहनराव पाटील यांचे ते सहकारी म्हणून शेवटपर्यंत त्यांना साथ दिली श्रीपूर हे माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील महत्वाचे केंद्रस्थानी असलेल प्रमुख शहर म्हणून ओळखले जाते वजाळे गुरुजी यांनी श्रीपूर मध्ये आंबेडकर जयंती सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम व भिमसैनिकांची फळी निर्माण केली आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सुरुवातीच्या काळापासून आठवले यांना श्रीपूर मध्ये सहकार्य व मोलाची साथ येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिली त्यात वजाळे गुरुजी यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे ज्या वेळी रामदास आठवले यांचा सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यात दौरा असायचा त्यावेळी कुर्डुवाडी येथून रामदास आठवले यांना घेण्यासाठी वजाळे गुरुजी यांची एक निळ्या रंगाची जिप गाडी घेऊन आम्ही युवा कार्यकर्ते वजाळे गुरुजी जात असायचो जेथे आठवले यांची सभा कार्यक्रम असेल तेथे त्यांना सोडायची जबाबदारी वजाळे गुरुजी यांच्या निळ्या जिप गाडीने केले आहे श्रीपूरला पन्नास ते साठ वर्षांपूर्वी मुकुंदराव आंबेडकर राजाभाऊ खोब्रागडे कर्नाटकचे खासदार निळू कट्टी संचारचे संपादक रंगा अण्णा वैद्य धर्मवीर वि रा पाटील भुईकोट चे संपादक विलास पाटील त्याचबरोबर अनेक नामवंत नेते विचारवंत श्रीपूर ला आणण्याचे मोठे काम वजाळे गुरुजी यांनी केले आहे मराठवाडा विद्यापीठ नामांतर गायरान आंदोलन अस्पृश्यता निवारण एक गाव एक पाणवठा अशा अनेक सामाजिक आंदोलनात वजाळे गुरुजी यांचा सहभाग राहिला आहे ते शांत मनमिळाऊ हजरजबाबी व आक्रमक स्वभावाचे होते ते लहानात लहान मोठ्यात मोठे असे त्यांचे व्यक्तीमत्व होते श्रीपूर बोरगाव महाळुंग अकलूज माळशिरस मधील सामाजिक राजकीय घडामोडी व परिवर्तनवादी चळवळीचे ते जबाबदार नेते म्हणून ओळखले जात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे ते विश्वासू कार्यकर्ते होते वजाळे गुरुजी यांचे समवेत संपत मोटे जांबूवंत कांबळे बापूराव गायकवाड निवृत्ती सुरवसे केरबा खरात सोपान भोसले असे जुने जाणते आंबेडकरी चळवळीतील सहकारी होते वजाळे गुरुजी यांनी श्रीपूर मध्ये दलित पँथर रिपब्लिकन पक्ष भारतीय दलित पँथर व आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट असा चढ उतार असलेल्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आहे संपत मोटे वजाळे गुरुजी राजाराम कांबळे व काही युनियनचे कार्यकर्ते हे कामानिमित्त सोलापूरला जिप गाडीने चालले होते तेव्हा पंढरपूर मोहोळ च्या मध्ये यांच्या गाडीचा अपघात झाला तेव्हा पाठीमागून तत्कालीन सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील हे सोलापूरला चालले होते त्यांनी ताबडतोब आपली गाडी थांबवली व जखमींना अन्य वहानाने सोलापूर येथील दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्याची व्यवस्था केली होती वजाळे गुरुजी यांचे अनेक सहकारी मित्र त्यांना सोडून गेले आहेत श्रीपूर मधील आंबेडकरी चळवळीतील व सामाजिक राजकीय पार्श्वभूमी व जुन्या काळातील एक शिलेदार असलेले बबनराव एकनाथ वजाळे गुरुजी यांचे आज वार्धक्याने निधन झाले आहे त्यामुळे श्रीपूर पंचक्रोशीतील अनेकांना हा धक्का बसला आहे त्यांच्या जाण्याने श्रीपूर मध्ये शोककळा पसरली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा