*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल 8378081147
----- बावडा (ता.इंदापूर) येथील हजरत बागसवार बाबा यांचा उरूसचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त संदल, कव्वाली, लंगर एक आम (महाप्रसाद) आयोजन करण्यात आले असल्याचे टिपू सुल्तान यंग ग्रुप व मुस्लिम समाज बांधव यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
हजरत बागसवार बाबा यांचा उरूस निमित्त बुधवारी सायंकाळी जामा मस्जिद येथून संदल मिरवणूकीने आणून मजारवर चढवण्यात येणार आहे. गुरूवार ३ एप्रिल रोजी मुख्य उरूसनिमीत्त दिवसभर दर्शन व लंगर ए आम (महाप्रसाद) व सायंकाळी प्रसिद्ध कव्वाल हासिम नाझा (बारामती) यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. तर शुक्रवारी सकाळी आठ जियारत होऊन उरूसची सांगता होणार आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा