*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
बालनाट्य शिबिरातून मुलांना अभिनयाची ओळख होते.तसेच कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. शिबिरात विविध विषयांवर प्रात्यक्षिके आणि चर्चा होतात.ज्यामुळे मुलांचा विकास होण्यास मदत होत असे मत शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ.शितलदेवी मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
अकलूज येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई शाखा अकलूजच्या वतीने ७ दिवसीय नृत्य,नाट्य व अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी मोहिते-पाटील बोलत होत्या.
सौ.मोहिते-पाटील म्हणाल्या, मुलांच्या अंगी उपजत कलागुण असतात. या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्य परिषदेने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.त्याचाच प्रत्यय म्हणजे आज ७८ मुलांनी घेतलेल्या सहभागावरून दिसून येतो. डिजीटल युगात नृत्य,नाट्य कला टिकवण्याचे काम कठीण आहे. पण आजच्या पिढीवर हे संस्कार करण्याचे काम नाट्य परिषदेच्या माध्यमातून होत आहे ही कौतुकास्पद बाब आहे असे सांगून सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नृत्य,नाट्या बरोबरच शारीरिक समतोल राखण्याचे काम विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी केले पाहिजे असे त्या म्हणाल्या.
यावेळी शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराज दगडे, नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य डॉ.विश्वनाथ आवड, संस्थेचे संचालक श्रीकांत राऊत, सहकार्यवाह सुनील कांबळे, लालासाहेब मुजावर,प्रशिक्षक मनोज वर्दम,श्रीकांत जाधव, आशिकी चिंतामणी यांच्यासह नाट्य परिषदेचे सदस्य व बालकलाकार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नागनाथ साळवे सर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा