*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
मध्य रेल्वे व्हॉलीबॉल खेळाडू संघटना सोलापूर तर्फे "जीवन गर्व पुरस्कार" सन्मानित, भारतीय रेल्वेचे माजी व्हॉलीबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक रशीद अहमद बागबान (निवृत्त चीफ तिकीट निरीक्षक, मध्य रेल्वे सोलापूर) यांची कन्या आणि जिल्हा परिषद शाळा ढोकी तालुका जिल्हा धाराशिव उस्मानाबाद आदर्श शिक्षिका कुमारी तबस्सुम रशीद अहमद बागबान यांना शिक्षण विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वतीने जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक १ मे रोजी धाराशिव बार्शी नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री (महाराष्ट्र राज्य) प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्तेप्रदान करण्यात आला
याप्रसंगी धाराशिव चे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर ,धाराशिव चे आमदार कैलास दादा पाटील, आमदार तानाजी सावंत तुळजापूरचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील, विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण , आमदार- विक्रम काळे, आमदार -प्रवीण स्वामी धाराशिव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष (भा.प्र.से) शिक्षणाधिकारी- सुधा साळुंखे, शिक्षणाधिकारी- अशोक पाटील, प्राचार्य दयानंद जटनुरे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला
याप्रसंगी बहुसंख्येने नागरिक व कर्मचारी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा