*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
कुर्डूवाडी (ता. माढा) या गावात व या गावच्या परिसरातील गावात चक्री व्यवसायीकांनी धुमाकूळ घातलेला आहे. चक्री खेळण्यासाठी पॉईंट्स पुरवणारे एजंट गल्लो गल्ली तयार झालेले आहेत. यात काही राजकीय नेते मंडळी सुद्धा आहेत. ते चक्री खेळण्याचा आमिष दाखवून तरुणांना भुरळ पाडत आहेत . यामुळे अनेक तरुण आपल्या घरातील पैसा, सोने, जमीन प्रसंगी चोरून किंवा विकून गहाण ठेवून हे चक्रीच्या नादी लागून त्यांनी कोट्यावधी रुपये उधळलेले आहेत. कुर्डूवाडी शहर व परिसरात 50 कोटी पेक्षा जास्त रक्कम या चक्रीच्या व्यवसायामध्ये लोक हरलेले आहेत यामुळे तरुणांचे आयुष्य उध्वस्त होऊन ते देशोधडीला लागले आहेत. अशा चक्री चालकांवर व एजंटावर मुका अंतर्गत कारवाई करावी अन्यथा दि. ५ जून रोजी प्रांत अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्याचा इशारा जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी दिला आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, माढा तालुक्यात व परिसरात चक्री गेम चे मोठे संकट आलेले आहे. कित्येक तरुण या मोहाला बळी पडलेले आहेत. झटपट पैसे कमावण्याच्या नादात ते झटपट भिकारी होऊ लागले आहेत. कोट्यवधींचा जुगार खेळून अनेक तरुण कंगाल झालेले आहेत. यामध्ये
चक्रीचे एजंट मात्र लाखो रुपये कमवून त्यांनी मोठी संपत्ती जमा केलेली आहे. त्यामुळे परिसरातील चक्री गेम चालक व एजंट यांच्यावर कारवाई व्हावी तसेच
या गुन्ह्याचा तपास निष्पक्षपणे करून यातून कोणालाही वगळण्यात येऊ नये. यांच्यावर कारवाई व्हावी अन्यथा दि.०५ जून २०२५ रोजी प्रांत अधिकारी कुर्डूवाडी यांच्या कार्यालयासमोर जनशक्ती शेतकरी संघटना तरुणांना सोबत घेऊन एक दिवसाचे उपोषण आंदोलन करणार असल्याचाा इशारा त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा