*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस तालुक्यातील संगम येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठलराव माणिकराव ताटे-देशमुख यांनी आपल्या शेतात उन्हाळी ज्वारीचे पिक घेतले होते.पिक ऐन जोमात असतानाच अचानक सर्वत्र अतिवृष्टी झाल्यामुळे ज्वारीच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
ताटे-देशमुख यांनी आपल्या दिड एकर क्षेत्रात उन्हाळी ज्वारीचे पीक घेतले होते.त्या ज्वारीच्या कणसाला पांढरे शुभ्र ज्वारीचे दाणे भरले होते.त्यामुळे पक्षांना ही चांगली मेजवानी झाली होती पण पीक काढणीसाठी आले असतानाच मे महिन्यात अचानक पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ज्वारीचे पिक भिजल्यामुळे उभ्या ज्वारी पिकाच्या कणीसामध्ये असलेल्या ज्वारीच्या दाण्यास नवीन ज्वारी उगवून आल्याने शेतकर्याचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.हातातोंडाला आलेल्या पिकाचे पावसाने मोठे नुकसान झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा