*सोलापूर ---प्रतिनिधी*
*आंबिद. बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून प्रहार संघटनेत अहोरात्र जनतेसाठी काम
करणाऱ्या, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर, लातूर, धाराशिव प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने संताजी धनाजी पुरस्कार वितरण व विभागीय मेळावा मा. बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत व निरीक्षक महेश बडे सर, मंगेशभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि.१२/०५/२०२५ रोजी सकाळी १० वाजता 'निर्मिती लॉन्स' विजापूर रोड, सोलापूर येथे पार पडणार असल्याची माहिती प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के-पाटील व जमीरभाई शेख यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
मा. बच्चुभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून प्रहार जनशक्ती पक्षातील कार्यकर्त्यांसाठी व सामाजिक परिवर्तनासाठी अहोरात्र झटणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी "संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान अभियान २०२५" ही योजना दि.१९ फेब्रुवारी २०२५ ते १० मार्च २०२५ पर्यंत राबविण्यात आली. सदर योजनेस प्रहार जनशक्ती पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिलेला आहे. सदर अभियानांतर्गत १) नेताजी सुभाषचंद्र बोस सोशल मीडिया पुरस्कार, २) संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार, ३) बाळासाहेब ठाकरे ऑल राऊंडर पुरस्कार, ४) छत्रपती शिवाजी महाराज राजकीय धुरंधर पुरस्कार, ५) स्वामी विवेकानंद प्रभावी वक्त पुरस्कार, ६) शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलन पुरस्कार असे सहा पुरस्कार विविध कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे. तद्नंतर विभागीय मेळावा पार पडणार आहे. यावेळी बच्चुभाऊ कडू हे उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. सदर मेळाव्यास सोलापूर, लातूर, धाराशिव या तिन्ही जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थितीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के-पाटील व जमीरभाई शेख यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा