*निमगाव (म)--प्रतिनिधी*
*रामचंद्र. मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
ओंकार साखर कारखान्यामुळे मुळे माळशिरस तालुक्याच्या विकासात भर पडली असल्याचे गौरवोदगार शेकापचे जयंत पाटील यांनी काढले.
ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोजे पाटील यांनी चांदापुरी ता माळशिरसयेथील साखर कारखाना ताब्यात घेऊन या परिसरातील ऊसाचे गाळप करून शेतकऱ्यांच्या ऊसाला समाधानकारक दर दिला रोजगार निर्मीती केली व नव्यानेच उपपदार्थ निर्मीती प्रकल्प हाती घेवुन माळशिरस तालुक्याच्या विकासात भर टाकण्याचे काम असे मत शे का प नेते जयंत पाटील यांनी मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंजी संभाजीराव पाटील निलंगेकर होते पुढे बोलताना पाटील म्हणाले की साखर उद्योग शेतकरी व सर्व सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे तो व्यवस्थित चालला पाहिजे ज्या भागातील साखर कारखाने आर्थिक अङचणीमुळे कारखाने बंद होते ते चेअरमन बाबुराव बोजे पाटील यांनी चालु करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक दरांना कर्मचाऱ्यांचे वेळेत पैसे दिले संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बोजे पाटील कमी कालावधीत नऊ साखर कारखाने व्यवस्थित चालविले या बद्दल ओंकार परिवाराचे कौतुक केले या कार्यक्रमासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ,माजी आमदार- संजय मामा शिंदे ,दादासाहेब फराटे पाटील, दादासाहेब बोत्रे पाटील, संचालक प्रशांत बोत्रे पाटील, ओंकारच्या संचालिका रेखाताई बोत्रे पाटील ओमराजे बोत्रे पाटील, उपस्थित होते शेवटी चेअरमन बाबुराव बोत्रे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा