*उपसंपादक --नूरजहां शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
माळीनगर येथील दि सासवड माळी एज्यूकेशन सोसायटी संचलित दि मॉडेल विविधांगी हायस्कूल मधील २००१ बॅच मधील १० वी च्या माजी विद्यार्थ्यांचा 25 वर्षानंतर स्नेह मेळावा (गेट टुगेदर) रविवार दि. २५ मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सुमारे ३५ मुले आणि ३० मुली अशा तब्बल ६५ माजी विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना प्राचार्य कलाप्पा बिराजदार यांनी सहकार्य आणि मार्गदर्शन केले. त्याचवेळी कार्यक्रमासाठी प्रशालेच्या ४ माजी प्राचार्यांना निमंत्रित केले होते यात ए . व्ही.कुलकर्णी , डी. एस. देशपांडे, के. बी. कुलकर्णी आणि पी. सी. चौरे उपस्थित होते. त्याच बरोबर विषय शिक्षक आर. सी. वाघमारे , कल्याण कापरे , कोळी आणि राजेश कांबळे हे देखील उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत शाळेच्या प्रांगणात शिक्षकांच्या हस्ते पर्यावरण पूरक वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात केली नंतर सर्वांनी आपला परिचय करून दिला आणि मनोगत व्यक्त करताना आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर प्राचार्य आणि माजी प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या गरीब मुलांना मदत म्हणुन वह्या आणि शालेय साहित्य सुपूर्द केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल निकम,अश्विनी राऊत - गिरमे, अनिल जाधव यांनी केले,
सदर कार्यक्रमासाठी अमित कांबळे, श्रेयस राऊत, यशवंत राऊत, स्वप्निल निकम, अनिल जाधव, अश्विनी राऊत- गिरमे, पूनम राजपुरे- तावरे, अनुराधा कोरे- मनगिरे, शबाना काझी आणि समिना शेख यांनी परिश्रम घेतले. श्रेयस राऊत यांनी आभार प्रदर्शन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा