Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २९ मे, २०२५

*पठाणवस्ती -लाडेवस्ती ता. माळशिरस दरम्यान बांधण्यात आलेल्या पुलामुळे नागरिकांची झाली गैरसोय दूर!...*

 


*माळशिरस तालुका --प्रतिनिधी*

  *रशीदभाई शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

पठाणवस्ती (ता.माळशिरस) येथून भारत देश स्वतंत्र झाल्यापासून ओढा वाहत आहे. तो ओढा पठाणवस्ती वरून लाडेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असुन,या ओढ्यावर पावसाळ्यात पाणी आले तर पठाणवस्ती-लाडेवस्ती परिसरातील नागरिकांना जाता येत नव्हते .आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असे,किंवा विद्यार्थांना ओढ्याचे पाणी कमी. होईपर्यंत शाळा बुडवावी लागत असे. म्हणुन या ओढ्यावर पुल व्हावा आमची होणारी गैरसोय दूर करावी.यासाठी प्राचीन काळापासून या परिसरातील नागरिक पुलाची मागणी करीत होते.परंतु आजतागायत यांची कोणीच दखल घेतली नाही. पुलाअभावी रात्री-अपरात्री ये जा करण्यासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असे. पठाणवस्ती होवुन लाडेवस्ती कडे जाणाय्रा ओढ्यावर पुल व्हावा याची मागणी पठाणवस्ती - लाडेवस्ती येथील ग्रामस्थांनी माळशिरसचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडे केली होती, याच मागणीनुसार आ.रामभाऊ सातपुते यांनी सदरच्या पुलासाठी 50 लाख रूपये निधी मंजूर केला पुलाचे काम पूर्णत्वास आले.व सध्या उन्हाळ्यातच पावसाने थैमान घातले असुन ओढा दुटप्पी भरुन वाहत आहे. व याच पुलामुळे परिसरातील नागरिकांना जाणे येणे सोपे झाले, हे आ.रामभाऊ सातपुतेमुळेच शक्य झाले आहे.याच पुलावरून प्रवास करण्याचा सुखद अनुभव परिसरातील नागरिकांना आला आहे. म्हणून पठाणवस्ती-लाडेवस्ती परिसरातील नागरिकांनी आ.रामभाऊ सातपुते यांचे मनापासून आभार मानले आहेत. जणुकाय आ.रामभाऊ च्या रूपात आम्हाला देवच भेटला असे सर्वसामान्याकडुन बोलले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा