उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
गेल्या ४० वर्षातील पहिला मान्सून पूर्व पाऊस हा मे महिन्यात पहिल्यांदाच वादळी वाऱ्यासहित झाला आहे.मान्सून पूर्व पावसामुळे शेतकऱ्यांच्या भुईमूग,आंबा,डाळिंब,कांदा,मका,कलिंगड,खरबूज,भाजीपाला या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.
कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन ही अधिकाऱ्यांनी त्यास केराची टोपली दाखवली आहे.हे लक्षात घेता युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी माळशिरस तहसील ऑफिसला निदेवदन देऊन नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपये मदत द्यावी.अशी मागणी युवा सेनेच्या वतीने केली आहे.अन्यथा युवा सेना रस्त्यावर्ती उतरेल असाही इशारा गणेश इंगळे यांनी दिला आहे. हे निवेदन माळशिरसचे नायब तहसीलदार अमोल कदम यांनी स्वीकारले.यावेळी शिवसेना तालुका समन्व्यक पिंटू तात्या चव्हाण,युवा सेना उप तालुका प्रमुख दुर्वा आडके,दत्ता साळुंखे, उत्तम ताटे,रामभाऊ गायकवाड इत्यादी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा