*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
*(पत्रकार) ----सांगली*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8983 587 160
पिंजरा सोन्याचा असला तरी तो "पिंजराच" असतो, त्याप्रमाणे मोठे घर ..पोकळ वासा..या उक्तीप्रमाणे श्रीमंत - करोडपती. स्थळ असेल त्या घरात आपली मुलगी "सुखी" राहील - आनंदी राहील ही समजूत असेल तर आपण मुर्खांच्या नंदनवनात. असाल. वैष्णवीला तब्बल 19 ठिकाणी अमानुष मारहाण करण्यात आली होती. वैष्णवीला "गरोदर" असताना दिवसभर पायात चप्पल न घालता उन्हात उभे राहायला सांगत "चटके" दिले गेले . शारीरिक - मानसिक छळ केला गेला. नवरा, नणंद - सासू -सासरे यांनी अमानुष त्रास दिला.
मुलगा होतं नसेल तर माझ्याबरोबर ये ..असे सांगणारा, वैष्णवीला मारहाण करणारा हरामखोर सासरा, स्वतःचे "लफडे" असताना वैष्णवी वर वारंवार थुंकणारी. टोचून - टोचून बोलणारी नालायक नणंद - सासू आणि खर्चासाठी लाखो रुपये उकळणारा नामर्द - निष्क्रिय नवरा या सर्वानी लग्नानंतर आणखी 2 कोटी देण्यासाठी वैष्णवीच्या आईवडिलांवर "दबाव" आणला. हगवणे कुटुंबीयांनी लग्नात 51 तोळे सोने ,10 किलो चांदी ,फॉर्च्युनर गाडी हुंडा म्हणून घेतला. सुमारे 2 कोटी खर्च करत, आलिशान विवाह होण्यासाठी वैष्णवी च्या आईवडिलांनी कोणतीच "कसर" ठेवली नव्हती. परंतु वारंवार आईवडिलांना पैसे देण्यासाठी वैष्णवीवर दबाव. वाढत चालला होता. हा सर्व "त्रास" असाह्य झाल्यामुळे आणि लव्हमॅरेज करून स्वतः "चूक" केली ही "मानसिकता" वैष्णवी ची झाली होती.तशी कबुली तिच्या मामाला तिने दिलीही होती. सासरच्या "अमानुष" त्रासामुळे अखेर वैष्णवीने आत्महत्या करत आपली * जीवनयात्रा संपवली. ही आत्महत्या नसून हत्याच आहे. "माणुसकीशून्य" हगवणे कुटुंबियांना फाशीची" शिक्षा व्हायला हवी.
*मुद्दा नंबर 1*
*आई - वडिलांचे असुरक्षित कवच !*
लग्ना आधी आणि लग्नानंतर ही मुलीला हे "घर" तुझेच आहे, काही अडचण असेल तर बिनधास्त पुन्हा "घरी ये" ...हे न सांगता तू उभी गेलीस ,येताना आडवी ये...आता "सासरचे घरचं" तुझे घर ,या घराशी तुझा संबंध संपला अशी सूचना आई वडील वारंवार करत असतात. त्यामुळे सासरी काही घडले - जाच झाला - छळ झाला तर आईवडिलांनी घरी यायचे "बंध छाटले. आहेत म्हणून आत्महत्याचा* पर्याय निवडतात.
पालकांनी मुलींना मानसिकदृष्ट्या सक्षम बनवत काहीही झाले तर आम्हाला "सांगायचे कारण नसताना "ऐकायचे" नाही, "उत्तर" द्यायचे , त्रास दिला अथवा "छळ" झाला तर ताबडतोब आम्हाला सांगायचे ,हे घर तुझे होते आणि तुझेच राहील हे संरक्षण कवच आईवडिलांनी द्यायला विसरतात. वास्तवीक मुलीचे आई - वडील तिला हे सांगत नाहीत. त्यामुळेच असुरक्षिततेमुळे मुलींच्या आत्महत्या वाढत आहेत.
*मुद्दा नंबर 2*
*पोलिसांची निष्क्रियता मृत्यूस कारणीभूत ??*
एखाद्यावेळेस सासरी हुंडाबळी अथवा छळ होतं असेल म्हणून पोलिसात "तक्रार" करण्यासाठी आल्यास पोलीस "गांभीर्याने"या विषयाकडे पाहत नाहीत असा "सुर" आहे.पोलीस विषयांची "गंभीरता पाहत मुलाच्या सासरच्या लोकांना बोलावून त्यांना कडक शब्दात "समज" दिली अथवा हुंडाबळी बद्दल ताकीद दिली तर पुन्हा त्या मुलीला त्रास देणार नाहीत. पण पोलीस ज्या मुलीने सासरच्या लोकांबद्दल अर्ज केलेला असतो तिलाच हाकलून लावलेले असते .त्यामुळे ती मुलगी हतबल होते,पोलीस कारवाई करत नाहीत , न्याय कोण देणार ?? म्हणून निराशेने ती आत्महत्या करते. त्रास सहन करून ,मुलीने आत्महत्या केल्यावरच पोलीस यंत्रणा जागे होणार का ??? वैष्णवीच्या वडिलांनीही पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता,परंतु दबावामुळे पोलिसांनी कारवाई केली नाही. हगवणे च्या मोठ्या सुनेने देखील हगवणे कुटुंबियांच्या छळाबद्दल पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे आणि तो देखील प्रलंबित आहे. पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा हा "आरसा" आणि पुरावा नव्हे का ?
*मुद्दा नंबर 3*-
*समाजाने दुसऱ्या विवाहाला संमती द्यावी*
एखाद्यावेळेस मुलीला जाच आहे म्हणून त्या मुलीला आई - वडील घरात आणतात. आणि सोडपत्र - डिवोर्स. घेतात. ज्या मुलीला विनाकारण "मारहाण" होतं असते,जिचा जीव जाणार असतो,अशा मुलीचे प्राण वाचवलेले असतात,त्या आईवडिलांना हा समाज जगू देत नाही.कारण मुलीचा पुन्हा दुसरा "विवाह" करायचा झाल्यास हाच समाज परवानगी देत नाही, नावे ठेवतो. आयुष्यभर त्या मुलीने असेच राहायचे ही प्रथा बंद झाली पाहिजे. तिचे मन. आहे, तिचे "आयुष्य" आहे.पून्हा विवाह करायचा तिचा "अधिकार" तिला मिळायला हवा. जर विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होतं असतील तर हाच समाज तिला आणि तिच्या आई वडिलांना शिव्या देतो,पण त्या मुलीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न लावून देऊया असे सांगत नाही.
दुतोंडी. समाजाचा विचार न करता प्रत्येक आईवडिलांनी जर छळ होऊन मुलगी घरी आली आणि नाईलाज झाला तर त्या मुलीचा दुसरा विवाह लावून द्यावा.
समाजात "बदल" होतं नाही ,पर्याय नसतो म्हणूनही अनेक मुली आत्महत्येचा पर्याय निवडत असतात. समाजांने विचार केला तर अशा आत्महत्या आपण रोखू शकतो. किमान 7500 आत्महत्या महाराष्ट्रात होतं असतील तर संपूर्ण समाजाने आता "पुरोगामी" दृष्टिकोनातून विचार केलाच पाहिजे. हगवणे सारखे समाजात शेकडो करोडपती भिकारी. आहेत, जे बाहेरून श्रीमंत पण आतून मनाने भिकारी मानसिकतेचे आहेत. समाजाने डोळसपणे विचार करावा आणि मुलींच्या "आत्महत्या " थांबवाव्यात !
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा