*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांना सुमारे ३१ हजार भाकरी व १३५ किलो बेसनाचे पिठले,ठेचा,लोणचे, कांदा अशा अस्सल ग्रामीण आस्वादाचे अन्नदान करण्यात येणार आहे.यासाठी १० शाखेतून ११ हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांनी संस्थेच्या वतीने सन २०१५ पासून वैष्णवांना अन्नदानाची सुरुवात केली.तीच परंपरा संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,सदस्या स्वरूपाराणी मोहिते पाटील,युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत सुरू आहे.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दि. १ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (ता.माळशिरस) येथे आगमन होत आहे.पालखीचा आदल्या दिवशीचा मुक्काम सराटी (जि.पूणे) येथे असतो.सराटी व अकलूज हे अंतर केवळ तीन किलोमीटर असल्याने व अकलूज येथे मुक्कामाच्या मोठ्या सुविधा असल्याने लाखो वैष्णव आदल्या दिवशीच मुक्कामाला अकलूजला येतात. आदल्या दिवशी मुक्कामास येणाऱ्या वैष्णवांनाही अन्नदान व्हावे.त्यांना घरगुती भोजनाचा आस्वाद मिळावा या हेतूने संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अन्नदानाला सुरुवात केली.
अन्नदान वाटपाचे हे ११ वे वर्ष आहे.अकलूज सराटी महामार्गावर होणा-या या अन्नदानात सदाशिवराव माने विद्यालय अकलूज,महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर,जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अकलूज,लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर,महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग,श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय अकलूज या ६ शाखेतून सुमारे ९ हजार विद्यार्थी अन्नदानात सहभागी झाले.येथे २१ हजार भाकरी,७० किलो बेसन पिठलं, हिरव्या मिरच्याचा ठेचा,लोणचं, कांदा असा ग्रामीण भोजनाचा सहभाग आहे. दिनांक ३० जून रोजी दुपारी ३-३० वाजता अकलूज सराटी महामार्गावरील अकलूज हद्दीत हे अन्नदान होणार आहे.
तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी संस्थेच्या सदाशिवनगर येथील कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेज सदाशिवनगर यांच्या वतीने मांडवे (ओढा) विसावा येथे दि. १ जूलै रोजी ५ हजार ५०० भाकरी व ३५ किलो बेसन, ठेचा, लोणचे असे अन्नदान होत असून यामध्ये सुमारे १ हजार २५० विद्यार्थी सहभागी होत आहेत.व वेळापूर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय, प्राथमिक,माध्यमिक व अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय, वेळापूर यांच्या वतीने दि.२ जूलै रोजी ४ हजार ५०० भाकरी, ३० किलो बेसन,ठेचा,लोणचं असे अन्नदान होत असून या मध्ये १ हजार विद्यार्थी सहभागी होत आहेत.
यावेळी मुख्याध्यापक संजय गळीतकर,अमोल फुले, मुख्याध्यापिका सौ सुनीता वाघ, प्रा.राहुल सुर्वे,शिवाजी पारसे,सौ अनिता पवार,विजय निंबाळकर, नामदेव कुंभार आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा