*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
मुंबई- देशात पुन्हा एकदा हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे टेन्शन वाढलं आहे. देशात आतापर्यंत ३ हजार ३९५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत या वर्षातला पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
राजधानी दिल्लीत रुग्णसंख्या २९४ वर जाऊन पोहचली आहे. तर महाराष्ट्रातही कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ४६७ वर पोहोचलीय. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोविड १९ चे ८४ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत राज्यात नोंद झालेल्या कोरोना संसर्गाची एकूण रूग्णसंख्या ६८१ झाली आहे. त्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४६७ आहे. कोरोना वेगानं पसरत असला तरी घाबरु नका, असं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा सौम्य आहे. मात्र, त्याचा परिणाम गंभीर रुग्ण आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांवर होत आहे.
त्यामुळे मागील अनुभव लक्षात घेत राज्यातल्या अनेक शासकीय रुग्णालयात कोरोना उपचाराचे विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. मात्र नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करणे गरजेचे आहे. सध्या स्वत:ची काळजी स्वत: घेणे हाच उत्तम पर्याय आहे. सातारा जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत असणाऱ्या ७० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी सांगितले. साताऱ्यात दोन दिवसांपूर्वी अडीच वर्षांनंतर कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यांपैकी एक कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर रहिमतपूर येथील रहिवासी असणारी मृत वृद्धा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. कोरोना झाल्यानंतर अंतिम स्तरावर ती रुग्णालयात दाखल झाली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा