*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल नंबर 8378081147
----- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी (त्रिशताब्दी) जयंती बावडा ग्रामपंचायतच्या वतीने गणेशवाडी येथे साजरी करण्यात आली. प्रतिमेस सरपंच सौ. पल्लवी रणजित गिरमे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.
गणेशवाडी येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आयोजित विशेष कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महादेव घाडगे, संतोष सुर्यवंशी, विठ्ठल घोगरे, सुधाकर कांबळे, तानाजी गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी अंबिका पावसे, किरण खंडागळे, अश्वजित कांबळे, विशाल कांबळे, सुरेखा कुंभार, बशीरा तांबोळी, मंडाबाई घोगरे, अश्विनी साठे, अश्विनी घोगरे, कोमल दासरे, राणी गोरवे, रफिया तांबोळी, रतन खंडागळे, लतिका घोगरे, बायडा घोगरे, लक्ष्मिबाई खंडागळे आदि मान्यवर उपस्थित होते.
नरसिंहपूर परीसरातील पिंपरी बुद्रुक, गिरवी, नरसिंहपूर, टणू, गोंदी, ओझरे, लुमेवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दि जयंती साजरी करण्यात आली.
फोटो - गणेशवाडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच पल्लवी गिरमे यांच्या हस्ते करण्यात आले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा