*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
----- जगतगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी सराटीत मुक्कामास येणार आहे. मात्र इंदापूर अकलूज पालखी मार्गाचे काम चार वर्षांपासून रखडल्याने वारकऱ्यांचा खडतर मार्ग होणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने सराटी पर्यंतचे काटेरी बाभळी, गवत, राडारोडा काढलेला नाही.
जगतगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूरचा मुक्काम आटोपून सोमवारी पुणे जिल्ह्यातील शेवटचा सराटी मुक्कामी येणार आहे. परंतू इंदापूर अकलूज ३० किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे काम चार वर्षांनंतरही रखडलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांनी मार्गाच्या दुतर्फा उगवलेल्या काटेरी कुबाभळी, गवत तसेच राडारोडा काढलेला नाही. यामुळे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी एकदाही सराटी मुक्कामी भेट देण्याचे धाडस केलेले नाही. सराटी मुक्काम आटोपून पालखी अकलूज कडे मार्गस्थ होतानाच रस्त्याच्या दुतर्फा काटेरी कुबाभळ वाढून रस्त्यावर झुकलेली असल्यामुळे वारकरी, रथाचे बैल व यंत्रणेतील कर्मचारी व अधिकारी यांना तोंडाला, हाताला ओरबडण्याची शक्यता आहे. तर पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पालखी, वारकरी यांना त्रास होण्याची जास्त शक्यता आहे.
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे कामात निष्काळजीपणा, हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करणार का? असा सवाल वारकरी, भक्तातून केला जात आहे. तसेच रस्त्याचे अडकलेले काम तातडीने पूर्ण करण्यात येणार का?
फोटो - सराटी येथील पालखी मार्गावरील पुला लगत काटेरी कुबाभळ व गवत रस्त्यावर आले आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा