*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते- पाटील पुण्यतिथी निमित्त श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर शाळेत रत्नाई पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रशालेतील पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभागातील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या माता पालकांना रत्नाई पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी प्रशाला समिती सदस्य महादेव अंधारे, संग्रामनगर ग्रामपंचायतीचे सरपंच अजित रेवंडे,पालक प्रतिनिधी विक्रम उबाळे, अतिक शेख, मुख्याध्यापक मल्हारी घुले सर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक गणेश करडे सर आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते हिंदवी ऋषीकेश देवशेटे,शिवन्या मिनीनाथ शिंदे, सारा अतिक शेख, वेदांत निलेश घोडके, माहेश्वरी विक्रम उबाळे, सोहम गणेश पवार, अद्विक अमोल बनपट्टे,ज्ञानेश्वरी विक्रम उबाळे, जिया अतिक शेख, राजनंदीनी पांडुरंग माने, मृणाली बीटाजी खाडे, संयोगिता पांडुरंग माने, एसएससी परिक्षेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल हिंदवी राजेंद्र शिंदे, द्वितीय क्रमांक अफताब शकील शेख, तृतीय क्रमांक चैतन्य राजेंद्र अनपट विज्ञान विषय प्राविण्य मिळवल्या बद्दल नक्षत्रा राजकुमार तरटे यांना गौरवचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त २५ झाडांचे वृक्षारोपण आणि कुंडीतील रोपांची लागवड करण्यात आली.
स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मल्हारी घुले सर यांनी केले.सहशिक्षक सुरेश माने यांनी श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जीवनाकार्याचा आढावा घेतला. सुत्रसंचालन संयोगिता माने, आनम शेख, विश्वनाथ हलकुडे यांनी केले. तर प्राथमिक विभाग मुख्याध्यापक गणेश करडे सर यांनी सर्वांचे आभार मानले. सारे जहाँसे अच्छा देशभक्ती गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश शिंदे,सुभाष चव्हाण, सतिश एकतपुरे,संतोष कदम, रविंद्र कवटे,आरती दोरकर, कविता कुलकर्णी,रोहिणी गायकवाड,वैभवी बोदडे,शुभांगी कदम, शिला भुमकर, अशोक व्यवहारे, सुनील काळे यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा