*सोलापूर --प्रतिनिधी*
*आबेद. बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन खचली, चबुतऱ्याला भगदाड पडले याची चौकशी करून दोषी असलेल्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या शिष्टमंडळाने मा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना चेतन भाऊ नरोटे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेले गड किल्ले आजही सुरक्षित असताना या आधीही ऑगस्ट २०२४ मध्ये निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. त्यानंतर वर्षभराच्या आत त्याच ठिकाणी नवीन पुतळा उभा करण्यात आला. मे महिन्यात या पुतळ्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. शंभर वर्षे काहीही होणार नाही असा दावा सरकारकडून केला गेला. पण अनावरणाला शंभर दिवस ही झाले नसताना या पुतळ्याच्या चबुतऱ्याची भराव आता खचला आहे. पुतळ्याच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी मोठं भगदाड पडल्याचं दिसून येत आहे. यामुळे चबुतऱ्याच्या आजूबाजूचे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं स्पष्ट होत आहे. त्याबरोबरच राज्यात पूल कोसळत आहेत, नवे रस्ते खचत आहेत. विकासकामांचा डांगोरा पिटणाऱ्या महायुती सरकारचे काम किती गुणवत्तापूर्ण असते हे महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी बघतोय टक्केवारी आणि मलिद्यात अडकलेल्या महायुती सरकारकडून अपेक्षा काय करणार?
यावरुन हे सरकार महापुरुषांचे पुतळे विचारांचा आदर्श आणि प्रेरणा म्हणून उभारतंय की केवळ ठेकेदारांसाठी, असा प्रश्न महाराष्टातील जनतेला पडत आहे. महिन्याभरात भराव कसा खचला याचं उत्तर सरकारने द्यावं. भराव खचल्याचा अर्थ हे कामसुद्धा निकृष्ट दर्जाचं आहे, हे दिसतं आणि शिवप्रेमी म्हणून आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही. सरकारने याची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी.
यावेळी चेतनभाऊ नरोटे, मा. नगरसेवक विनोद भोसले, मा. नगरसेविका परवीन इनामदार, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सरचिटणीस नरसिंह आसादे, शकील मौलवी, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, कार्याध्यक्ष हणमंतू सायबोलू, प्रवक्ते नागनाथ कदम, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव, अँड केशव इंगळे, अनिल मस्के, सागर उबाळे, सुमन जाधव, हेमाताई चिंचोलकर, लखन गायकवाड, परशुराम सतारेवाले, संजय गायकवाड, राजेश झंपले, शफी हुंडेकरी, विवेक कन्ना, भीमराव शिंदे, अनिल जाधव, सुभाष वाघमारे, गिरिधर थोरात, हारून शेख, श्रीशैल रणधीरे, चक्रपाणी गज्जम, पृथ्वीराज नरोटे, शोभा बोबे, करीमुनिसा बागवान, ज्योती गायकवाड, शुभांगी लिंगराज, शिवाजी साळुंखे, शिवशंकर अंजनाळकर, बाबू विटे, मोहसीन फुलारी, दशरथ सामल, नूर अहमद नालवार, हाजीमलंग नदाफ, संजय कुऱ्हाडे, आकाश वाघमारे, मुमताज शेख, मुमताज तांबोळी, विजयालक्ष्मी झाकणे, वर्षा अतनुरे, राजी शागालोलू, मार्ता रावडे, सुनील डोळसे, अभिलाष अच्युगटला, अकबर शेख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा