Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ जून, २०२५

*तुळजापूर तालुक्यात भाजपला खिंडार मीनाताई सोमाजीसह असंख्य महिला कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील भाजपला मोठा धक्का देत, भाजप महिला कार्यकारिणी सदस्य मीनाताई सोमाजी यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. विशेष म्हणजे, त्यांनी तुळजापूरमधील असंख्य महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसेनेत प्रवेश करून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.


मुंबई येथे आयोजित भव्य प्रवेश सोहळ्यावेळी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते मीनाताई सोमाजी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे उत्साहात स्वागत करत, “मी नेहमी माझ्या लाडक्या बहिणींसोबत खंबीरपणे उभा राहीन आणि त्यांना पूर्ण सहकार्य करीन,” असा विश्वास दिला.


या प्रवेश सोहळ्याचे आयोजन शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले, धाराशिव जिल्हाध्यक्ष मोहन पनुरे व नूतन तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेश सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


मीनाताई सोमाजी या मागील अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असून महिला क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या अचानक शिवसेनेत प्रवेशाने भाजपच्या स्थानिक संघटनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या सोबत तुळजापूर शहरातील विविध प्रभागांमधील महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून, तालुक्यात सेनेची ताकद वाढवली आहे.


तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “हा पक्षप्रवेश केवळ सुरुवात आहे. लवकरच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळजापूरमध्ये एक भव्य पक्षप्रवेश मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्या मेळाव्यात विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील.”



आज झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यास तुळजापूर शहरातील शहर प्रमुख बापूसाहेब भोसले,उपशाहर प्रमुख रमेश काका चिवचिवे तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात व तालुक्यात यामुळे नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा