*अकलूज----प्रतिनिधी*
*शकुरभाई तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
१ जुलै रोजी अकलूज येथे जगद् गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अकलूज मुक्कामी राहणार आहे त्या अनुषंगाने सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणावर पालखी मुक्कामी असते त्या अनुषंगाने तुकाराम महाराज पालखी व रिंगण सोहळा व्यवस्थित पार पडावा आणि वारकरी भाविकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने अकलूजच्या उपविभागीय अधिकारी विजया पागांरकर, माळशिरस तालुक्याचे तहसीलदार शेजुळकर , अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे ,यांनी दि. ०१ जुलै रोजी अकलूज येथे मुक्कामी संत तुकाराम महाराज पालखी रिंगण सोहळ्याचे ठिकाण असलेल्या सदाशिवराव माने विद्यालयास भेट देऊन येथील असणाऱ्या रिंगण सोहळ्याची तयारी व यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची माहिती घेऊन तयारीचा आढावा घेतला. याप्रसंगी सदाशिवराव माने विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी उपलब्ध सुविधाची व तयारीची माहिती अधिकाऱ्यांना दिली. प्रांतधिकारी पागांरकर मॅडम यांनी येथील तयारी बाबत समाधान व्यक्त केले व वारकऱ्यांना कोणत्याही असुविधांना तोंड द्यावे लागू नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी असे सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा