उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
लाेककला,कलावंत,साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य,वडाळा महादेव,ता.श्रीरामपूर,जि.अहिल्यानगर आयोजित एक दिवसीय श्री.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज साहित्य संमेलनात कवी इंद्रजीत पाटील यांच्या ' चिबाड ' या कवितासंग्रहास संत ज्ञानेश्वर राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा नवीन कवितासंग्रह यावर्षीच प्रकाशित झाला असून हा पहिलाच राज्यस्तरीय पुरस्कार या पुस्तकाला मिळाला आहे.त्र्यंबकेश्वर सभागृह,वडाळा महादेव याठिकाणी संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.बाबूराव उपाध्ये,उदघाटक ह.भ.प.बाबा ससाणे महाराज,स्वागताध्यक्ष कवी राजेंद्र फंड,प्रमुख संयाेजक कवी बाबासाहेब पवार,इतर मान्यवर,साहित्यिक,कार्यकर्ते व रसिक श्रोत्यांच्या उपस्थित त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व राेख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप हाेते.इंद्रजीत पाटील यांना हा पस्तीसावा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला असून त्यांच्या साहित्यिक कामगिरीचे सर्वत्र कौतुक हाेत आहे.चंद्रकांत पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,जीवराज गरड, प्रकाश सकुंडे व डाॅ.मधुकर हुजूरे यांनी त्यांच्या साहित्यिक कामगिरीचे विशेष काैतुक केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा