Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २४ जून, २०२५

जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तयारीचा प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांनी घेतला आढावा, पावसामुळे वारकऱ्यांसाठी वाटरप्रुफ सभामंडपाची उभारणी करणार आण्णासाहेब कोकाटे

 


*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147

-----संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटच्या सराटी मुक्कामी तळाची व नीरा नदीतील पादुकांच्या शाही स्नान ठिकाणाला प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांनी भेट देवून पाहणी केली. 

    याप्रसंगी तहसीलदार जिवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब कोकाटे, सर्कल शेळके मॅडम, तलाटी लक्ष्मण चव्हाण, ग्रामसेवक अर्जून साळुंखे, कोतवाल मधूकर गायकवाड आदी मान्यवरांसह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

     पालखी मार्गावरील पुणे जिल्ह्यातील सराटी हे शेवटचे मुक्कामाचे ठिकाण आहे. येथे मोठ्या संख्येने वारकरी मुक्कामाला असतात. त्यासाठी प्रथमच वाटरप्रुफ शामियाना, विज, पिण्याचे व वापरण्याचे पाणी, शौचालय, अंघोळीचे पाणी तसेच वारकऱ्यांचे पाय दाबण्यासाठी व तपासणी करीता ११० डाॅक्टरांची व्यवस्था करण्यात आल्याचे माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब कोकाटे यांनी दिली.       

     योग्य नियोजन व सुरक्षा व्यवस्थेची योग्य ती काळजी, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, वैद्यकीय मदत, पिण्याच्या पाण्याचे टॅकर व्यवस्था, तसेच आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेचा आढावा प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांनी घेतला. यावर्षी पालखी सोहळ्यास मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत, स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि पालखी सोहळा मंडळ यांनी समन्वय ठेवून शांततेत सोहळा पार पाडण्याचे आवाहन तहसीलदार जिवन बनसोडे व गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी केले.

   


 यावेळी पालखी मुक्कामी तळाची, नीरा नदीवरील पादुकांच्या शाही स्नानाच्या परिसराची व मार्गांची पाहणी करून संभाव्य अडचणी संदर्भात सूचना दिल्या. सराटी ग्रामस्थ आणि वारकरी मंडळींनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो - सराटी येथील पालखीतळ, नीरा स्नानाच्या ठिकाणची पाहणी करताना प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी समवेत पदाधिकारी दिसत आहेत.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा