Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २४ जून, २०२५

*शहर नंतर आता ग्रामीणला क्राईम ब्रँच PI नितीन कौसडीकर नंतर संजय जगताप ठरले दुसरे*

 


*सोलापूर --प्रतिनिधी*

  *आबेद. बागवान*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी

सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी पोलीस निरीक्षक पदी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांची पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नियुक्ती केली आहे.

संजय जगताप यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांच्या स्वागताला पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच सोलापूर शहरातील नागरिकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

संजय जगताप यांनी यापूर्वी सोलापूर शहरात सदर बाजार पोलीस ठाण्यात पीआय म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती फौजदार चावडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी झाली. या ठिकाणी काम केल्यानंतर त्यांनी शहर पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक पदावर ही अनेक वर्ष काम केले.

नंतर मात्र त्यांची पुणे ग्रामीणला बदली झाली होती. दोन वर्षानंतर ते पुन्हा सोलापुरात आले सोलापूर ग्रामीणमध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी पदाचा कारभार पाहत असताना त्यांच्यावर आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सोलापूर शहराच्या गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पदानंतर ग्रामीण पोलीस विभागातील स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षकापदी नितीन कौसडीकर यांच्यानंतर संजय जगताप हे दुसरे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा