*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सततच्या पडत असलेल्या पावसामुळे भीमा नदी काठच्या लोकांना कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भिमानगर यांच्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येते की, उजनी धरणात आज दि. २४/०६/२०२५ रोजी सकाळी ६:०० वाजता उपयुक्त पाणीसाठा ७४.३८% इतका झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चालु असुन दौंड येथे १२११८ क्यूसेक्स इतका विसर्ग असून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने उपयुक्त पाणी साठ्यामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने दि. २४/०६/२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता उजनी धरणाच्या सांडव्यावरुन भीमा नदीमध्ये पूर नियंत्रणासाठी ३५००० क्यूसेक्स वरून ४०००० क्यूसेक्स इतका विसर्ग वाढविण्यात येत आहे. नदीतील एकूण विसर्ग सांडवा ४०००० क्यूसेक्स व विदयुत गृह = १६०० क्यूसेक्स असा एकूण ४१६०० क्यूसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये राहणार आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवक (inflow) नुसार विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता आहे.
तरी नदी काठांवरील गावांना व नागरिकांना आपले स्तरावरून सतर्कतेचा इशारा देणेबाबत विंनती आहे. हे आपले माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर.
कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा