*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
सोलापूर-पुणे महामार्गावर आढेगावच्या परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. महामार्गावर आज गुरुवारी पहाटे 4 वाजता एका खासगी बसला अपघात झाला. बसचालकाला झोप आल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात 30 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी 20 जणांची प्रकृती गंभीर असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील शिरपूरहून MH 48 के 1918 क्रमांकाची बस पुण्याला निघाली होती. बुधवारी रात्री उशिरा ही बस पुण्याकडे रवाना झाली. पहाटेच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर आढेगावच्या शिवारात बस अचानक पलटी झाली. "आढेगाव शिवारात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खासगी बस पलटी झाली," असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
बस खड्ड्यात पलटी झाल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी आणि इतर वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी प्रवाशांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली. महामार्ग पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातामुळे परिसरात काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून जखमींची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा