*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस तालुक्यातील फिनिक्स इंग्लिश स्कूल 25/4 लवंग मध्ये शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ एक अनोख्या उपक्रमाने झाला. शाळेच्या पहिल्या दिवशी पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवण्यासाठी फळझाडांची रोपे वाटप करण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांना एक एक फळझाडाचे रोप भेट देण्यात आले रोप देताना शिक्षकांनी वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व हवामान बदलावर त्याचा होणारा परिणाम आणि वृक्षारोपणाचे सामाजिक भान यावर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना रोपाचे संगोपन करण्याची जबाबदारी देण्यात आली असून वर्षभर त्याचे निरीक्षण करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात पर्यावरण पूरक उपक्रमाने झाली शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने फळझाडांची रोपे वाटप करण्यात आली . रोपवाटप सोहळ्यासाठी विद्यार्थ्यांना वृक्षाचे पर्यावरणात महत्त्व त्यांची निगा कशी राखावी आणि निसर्गाशी नाते कसे जपावे यावर माहिती देण्यात आली या उपक्रमा मागचा प्रेरणास्त्रोत शाळेच्या संस्थापक अध्यक्षा मा. नुरजहाँ शेख ह्या होत्या. त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच निसर्गप्रेम आणि जबाबदारीची जाणीव होणे अत्यंत गरजेचे आहे रोप लावणे हे फक्त एक कृती नसून ते भविष्यासाठी बीज रोवणे आहे शाळेतील शिक्षक व पालकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने रोपे स्वीकारून त्यांची काळजी घेण्याचे वचन दिले फिनिक्स इंग्लिश स्कूलचा हा उपक्रम निश्चितच इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा