Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २९ जून, २०२५

*या आश्रमात राहत असलेल्या महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या*-- *या घटनेने उडाली खळबळ*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिला किर्तनकाराच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या महाराष्ट्रात आषाढी वारीचा उत्साह सुरू असताना महिला किर्तनकाराची हत्या करण्यात आल्याच्या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

ह. भ. प. संगीताताई महाराज असं हत्या झालेल्या कीर्तनकार महिलेचं नाव आहे. त्या वैजापूर इथं एका आश्रमात राहत होत्या. २७ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने आश्रमात घुसून त्यांची हत्या केली. आरोपीनं अमानुषपणे त्यांच्या डोक्यावर दगडाने अनेक प्रहार केले. हे वार इतके गंभीर होते की, या हल्ल्यात संगिताताई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. तसेच फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झालं. ठोस पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही हत्या नेमकी का झाली आणि कोणी केली? याची कसलीही माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस याचा शोध घेत आहेत. मात्र महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात नेमके काय खुलासे होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा