*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
जागतिक योग दिनानिमित्त अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग प्रशालेत आज "जागतिक योग दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रशालेतील शिक्षक मुलाणी सर व बनपट्टे सर यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक करुन दाखवले.याप्रसंगी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी योगाचे सादरीकरण केले.
यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षिका, शिक्षक,शिक्षतेकर कर्मचाऱ्यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक केले.तसेच प्रशालेत आज "जागतिक संगीत दिन" साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थीनी कु.स्वरा दिनकर गायकवाड हिने "असावा सुंदर चॉकलेटचा बंगला" हे बालगीत सादर केले.सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिला प्रोत्साहन दिले.



 
 

 
 
 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा