*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे,शिवसेनेचे जेष्ठ नेते मारुती भाऊ अंबुरे,मनसेच्या नगरसेविका रेश्माताई टेळे, मनसेचे तालुका अध्यक्ष सुरेश टेळे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या प्रतीकात्मक मूर्तीवर दुग्धाभिषेक केला आणि शिवसेना व मनसे पुन्हा एकत्र यावे अशी प्रार्थना विठोबाला केली.कार्यकर्त्यांनी हातात बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फलक घेतले होते यावेळी मराठी माणसासाठी एक होऊ या अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना गणेश इंगळे म्हणाले की,बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न पाहिलं ते पुन्हा साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज साहेबांनी एकत्र यावं हीच विठोबाच्या चरणी प्रार्थना करून विठ्ठल रुक्मिणीस दुग्धाभिषेक घालण्यात आला.महाराष्ट्रात भाजपने जो राजकारणाचा चिखल केला आहे.त्याच चिखलात भाजपाला गाढण्यासाठी उद्धवजी ठाकरे आणी राज जी ठाकरे यांनी एकत्र येण्याची गरज आहे असे वक्तव्य गणेश इंगळे यांनी केले .
मनसेच्या नगरसेविका रेश्माताई टेळे याही बोलताना म्हणाल्या की,महाराष्ट्रत ठाकरे ब्रॅण्ड ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा आणी मनसेचा झेंडा फडकल्या शिवाय राहणार नाही त्याच बरोबर आख्या महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेवरती मनसेची आणी शिवसेनेची एक हाती सत्ता आल्या शिवाय राहणार नाही.
यावेळी शिवसेनेचे महादेव बंडगर,दत्ता साळुंखे, रणजित कदम,रणजित बागल अप्पासाहेब कर्चे,कुंडलिक मगर, लक्ष्मण नरुटे,अमित दोशी,रुपेश लाळगे,लक्ष्मण डोईफोडे,युवराज पवार,आकाश माने,पिंटू गायकवाड,आनंद घोडके,महादेव लोखंडे,आकाश सिद,सनी गुरव इत्यादी मनसे आणी युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा