उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित,दि मॉडेल विविधांगी प्रशाला माळीनगर या शाळेची शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची सुरुवात शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत सोहळा या दिमाखदार कार्यक्रमाने उत्साहात करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे हे होते.यावेळी सचिव अजय गिरमे,खजिनदार ज्योतीताई लांडगे,संचालक पृथ्वीराज भोंगळे,दिलीप इनामके,प्रशालेचे प्राचार्य कल्लाप्पा बिराजदार, उपप्राचार्य रितेश पांढरे, पर्यवेक्षक कल्याण कापरे तसेच पुरुष,महिला पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी सर्व विद्यार्थी,शिक्षक यांची शाळा प्रवेशोत्सव फेरी माळीनगर मधून काढण्यात आली व नंतर प्रशालेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून व्यासपीठापर्यंत सर्व नवागतांना हातात फुगे देऊन व टाळ्यांच्या गजरात त्यांना हायस्कूल चौकात घेऊन स्वागत करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते औपचारिक स्वरूपात पाचवी मधील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले.इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांना तसेच १० वी व १२ वी मधील पहिले तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प पेन देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तालुकास्तरावर वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी सुलभक म्हणून प्रशिक्षण देणारे प्रशालेतील जेष्ठ शिक्षक दत्तात्रय अवघडे,अमोल भालके व संजय बांदल यांना मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प व पेन देवून सन्मानित करण्यात आले. विकलांग विद्यार्थी संदीप चोरमले व त्याची बहीण रेणू चोरमले या बंधू- भगिनींना कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र गिरमे यांनी महात्मा फुले पतसंस्था माळीनगरचे वतीने त्यांचा सर्व शिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च करण्याची व त्यांना व्यवसायिक करण्याची संधी देण्याचे आश्वासित करण्यात आले.तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा गजरात निर्णयाचे स्वागत केले.
कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे बाळासाहेब सोनवणे, संजय पवार,संजय बांदल, रणजित लोहार,श्री.बागवान तसेच डेकोरेट करणारे सर्वांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना गोड शिरा व मसाला भात या पदार्थांचे दुपारचे सुट्टीत वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बांदल यांनी केले,बक्षीस वितरण वाचन नवनाथ गायकवाड यांनी केले तर आभार उपप्राचार्य रितेश पांढरे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा