*अकलूज----प्रतिनिधी*
*शकुरभाई तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
श्री महावीर जैन विद्यालय अकलूज या प्राथमिक विद्यालयातील बालचमुंनी दि. १ जुलै रोजी तुकाराम महाराज पालखी आपल्या अकलूज मध्ये येत असून त्या पालखीचे स्वागत करण्यासाठी तसेच सर्व भाविक भक्त आणि नागरिकांसाठी बाल दिंडीचे आयोजन करून एक संदेश दिला की आपल्या गावामध्ये पालखी येत आहे या बालदिंडीचे नियोजन करण्यात आली आणि ह्या दिंडीचे अतिशय सुंदर स्वरूप करण्यात आले होते शाळेतून निघालेली पालखी शिवापूर पेठेतून विजय चौक या ठिकाणी आली त्या ठिकाणी शिवपालखीचे दर्शन घेऊन रिंगण झाले. तसेच मुलांनी साक्षरता विषयक पथनाट्य सादर केले. सर्व वेगवेगळ्या विविध वेशभूषा, केशभूषा सहित संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत सोपान देव, मुक्ताबाई, जनाबाई, भारत माता शिवाय जिजाबाई आणि शिवाजी महाराज या अशा विविध रूपरेखा सादर केलेले होत्या आणि अतिशय सुंदर असे मुलांनी सादरीकरण केलेले होते यासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष राजकुमार दोशी यांनी या मुलांचे कौतुक केले तसेच शिक्षकांचेही अभिनंदन केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक सातपुते सर सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांनी नियोजनबद्ध दिंडीचे नियोजन केले आणि रायगड वरून शिव पालखी येत असते त्या शिवपालखीच्या संयोजकांनी सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षिका व पालकांनी
महाप्रसादाचा लाभ घेतल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा