Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १२ जून, २०२५

*प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून माळशिरस तालुका दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पक्ष अन्नत्याग आंदोलन करणार*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या संयुत्ता विद्यमाने आयोजित अन्नत्याग उपोषण 2025 नसून, हे एक जनआंदोलन आहे. शेतकरी, दिव्यांग आणि उपेक्षितांच्या न्यायासाठीचा निर्णायक लढा आहे.


आज राज्यातील लाखो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे त्यांचे उत्पन्न शून्याच्या आसपास पोहोचले आहे. दिव्यांग बांधवांना आजही फक्त रु. 1500 पेन्शनर जगावं लागते, ते अत्यंत अन्यायकारक आहे. शेतमालाला हमीभाव, शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांग बांधवांना प्रतिमाह रु. 6000 पेन्शन मिळवून देण्यासाठी लढा देणारी आहे. महाराष्ट्रभर होणान्या या अन्नत्याग उपोषणातून आम्ही सरकारला जागं करणार असून, शेतकरी व दिव्यांग यांचे हक्क मिळविण्यासाठी निर्णायक आवाज उठवणार आहोत.


अन्नत्याग उपोषण म्हणजे संघर्षाची नांदी, परिवर्तनाची ग्वाही आणि न्यायासाठीची सच्ची हाक प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या मागण्या पुढील प्रमाणे 

 1) दिव्यांग व विधवा महिलांना रुपये 6000/- मानधन देण्यात यावे 

 2) आपण केलेल्या संकल्पानुसार त्यांना कर्ज माफी शेतमालाला MSP ( हमीभाव) व 20 टक्के अनुदान देण्यात यावे

 3) 7 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री सोबत झालेल्या बैठकीत इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढावे 

 4) युवकांच्या हाताला काम द्यावे नाहीतर सन्मान जनक मानधन देण्यात यावे, रिक्त जागा तातडीने भराव्यात, जास्त पदसंख्येच्या जाहिराती प्रसिद्ध करावेत 

 5) शहराप्रमाणे गावातील घरकुलाकरिता समान निकष लावून किमान पाच लाख रुपये घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे 

 6) शेतकऱ्याप्रमाणे शेत मजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य देण्यात यावे तसेच शेतमजुरांचे स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे 

 7)MREGS मधून पेरणी ते कापणी पर्यंत सर्व मजुरीची कामे घेण्यात यावी तसेच फळ पिकांना 3.5, चार रेशो लावून दूध व्यवसाय सुद्धा MREGS ला जोडण्यात यावा हे होत नसेल तर तेलंगणाच्या धरतीवर एकरी रुपये दहा हजार रुपये मदत किंवा भावाचा चढ उतार निधी देण्यात यावा 

8) रासायनिक खताला ज्याप्रमाणे अनुदान देण्यात येते त्याप्रमाणे शेणखताला व सेंद्रिय खताला अनुदान देण्यात यावे 

 9) मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्रपणे धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत

  इत्यादी मागण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी व गुरुकुल मोझरी ता. तिसगाव जिल्हा अमरावती येथे आमदार बच्चू कडू यांचे अन्य त्या उपोषण चालू आहे 



 दिव्यांग शेतकरी बेघर ग्रामपंचायत कर्मचारी शेतमजूर मूकबधिर कामगार वाहन चालक मेंढपाळ मच्छीमार प्रहार क्रांती संघटना आयोजित उपोषणाला आज पाच दिवस झाले आमचे दिव्यांगाचे दैवत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या उपोषणाला आणखी किती दिवस लागणार आहेत दिव्यांगाच्या हक्कासाठी अन्न त्याग उपोषणाला माळशिरस तालुक्यातून पाठिंबा देत असून आमच्या मागण्या मंजूर नाही केल्या तर आम्ही माळशिरस तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा