*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
-----समतेवर आधारित मन, मेंदू व मनगट बळकट करण्यासाठी शिक्षण ही आदर्श गुरुकिल्ली असल्याचे राजर्षी शाहू महाराज यांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांना प्रजाहितदक्ष, लोककल्याणकारी राजे म्हणून ओळखले जाते असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अनिल कांबळे यांनी केले.
बावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार अनिल कांबळे बोलत होते. भन्ते गौतम जगताप यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त शाळेतील मुला-मुलींना शाहू राजांच्या शैक्षणिक कार्य व विचाराबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते विशाल कांबळे, सुयश कांबळे, मुख्याध्यापिका राणी करडे मॅडम, शिक्षिका सोनाली साळुंखे मॅडम व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त शाळेतील मुला-मुलींना खाऊ वाटप करण्यात आले.
फोटो - बावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा