Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ जून, २०२५

*महर्षी प्रशालेने दिंडी पालखीच्या रूपाने दिला भक्तिमय संदेश*

 


*अकलूज ---प्रतिनिधी*

  *कादर भाई शेख*

 *टाइम्स 45 न्युज मराठी

महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक शाळा यशवंतनगर येथे आज इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची दिंडी-पालखी सोहळा मोठ्या आनंदात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरूवातीला अध्यक्ष ह.भ.प.बाळासाहेब झांबरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच स्वर्गीय श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.झांबरे महाराजांची दिंडीचा इतिहास सांगितला.तर प्रशालेतील सहशिक्षका रेखाताई गुंड यांनी आक्कासाहेबांना शब्दपुष्पांजली अर्पण करीत त्याच्या जीवनकार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. ...

     युवा नेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी अश्वाचे पूजन करून पालखी सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. बालवारकर्यांचे कौतुक केले.

       दिंडी-पालखी सोहळ्यात पुढे दोन रूबाबदार अश्व,त्यामागे पताकाधारी,टाळकरी,तुळशीवृदांवन घेतलेले चिमुकले हात,वारकऱ्यांच्या वेशातील बालवारकरी त्यांच्यापुढे पालखीतील विठ्ठल-रक्मीणीच्या अभिरूपातील विद्यार्थी,कोणी संत ज्ञानेश्वर तर कोणी संत तुकाराम, संत एकनाथ,संत रामदास,संत नामदेवांच्या बरोबर मुक्ताई-जनाई रूपात बाल वारकरी आले होते.   

      पालखी सोहळा प्रशालेच्या प्रांगणातील ग्रामप्रदर्शनेला गेला.त्यावेळी प्रशालेच्या सभापती स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी शिवरत्न बंगल्यासमोर पालखी चे दर्शन घेत काही अंतर दिंडी बरोबर चालून बाल वारकर्यांना प्रोत्साहन व शाबासकी दिली.  

     स्वरूपनगर,सुमित्रानगर भागात अनेक नागरिक-पालकांनी बाल दिंडीचे स्वागत करून दर्शन घेतले.

       माजी मुख्याध्यापक बाळासाहेब मगर यांच्या कडून सर्व बाल वारकऱ्यांना डिंकलाडू-पाण्याची सोय केल्याने लेकरांचा कंटाळा निघून गेला.       

      ग्रामप्रदक्षने नंतर प्रशालेच्या मैदानावर रिंगण सोहळा रंगला.शिस्तीत सर्व पताकाधारी,टाळकरी,तुळशीवृदांवन आणी वारकऱ्यांचे विठ्ठल नामाचा जयघोष करत रिंगणाचा आनंद घेतला.अश्वाच्या रिंगणाने बाल वारकर्यात आणखीन उत्साह वाढवला. शिक्षक-पालकांनीही फुगडीचा आनंद घेतला.पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.  

      प्रशालेच्या सभापती स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडी पालखी सोहळ्यात सातशे हून अधिक विद्यार्थ्यां,पालक,शिक्षकांनी महाप्रसादाचा आनंद घेतला.  

     मुखात ज्ञानोबा-तुकोबाचा गजर,दिंडीतील शिस्त,भक्तीचा आनंद,रिंगण सोहळ्याचा प्रत्यक्ष आनंदाने बालवारकरी सुखावले. सोहळ्याचे सूत्रसंचालन रमेश गायकवाड यांनी केले.मुख्याध्यापक शिवाजी पारसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी परिश्रम घेत सोहळा यशस्वी केला.

      यशवंतनगर परिसरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापुर्वी भक्तीमय वातावरण निर्माण झाल्याची चर्चा नागरिक व पालक वर्गात होत होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा