*अकलूज ----प्रतिनिधी*
*शकुरभाई----तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
*अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदाशिवराव माने विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पेढे देऊन स्वागत करण्यात आले.*
*यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे संचालक बाळासाहेब सणस,विद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य आप्पासाहेब मगर, विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले,उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य सुभाष मुंडफने,कला वाणिज्य विभागाचे प्रमुख संजय जाधव,पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, पर्यवेक्षक सुजित कांबळे उपस्थित होते.
*यावेळी नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचे सत्कार करण्यात आले.इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
*मुख्याध्यापक अमोल फुले यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून स्वागत केले.सूत्रसंचालन संदिप शिंदे यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा