*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथील श्री विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालयातील सन २००० मधील इयत्ता १० च्या विद्यार्थी- विद्यार्थीनी यांनी २५ वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहात साजरा केला.
या स्नेह मेळाव्याची सुरवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून दिप प्रज्वलन गुरुवर्य व विद्यार्थी यांचे शुभहस्ते करणेत आले.त्यानंतर गुरूवर्य एस.एन.दुपडे सर,डी.बी. आवताडे सर,पिसे सर,राजाराम काळे सर,बाळासाहेब काशिद सर व धर्मराज दगडे सर यांचे गुरूपूजन,सन्मान व सत्कार करण्यात आला.जवळ जवळ २५ वर्षानंतर एकत्र आल्यामुळे मुली व मुले तसेच गुरूजन हे ओळखू शकले नाहीत.त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपआपला परिचय करून देते वेळी आश्चर्य वाटले कारण वर्गात पाठीमागच्या बेंचवरील कधीही न बोलणारा विद्यार्थीही हा सुद्धा यशस्वी झाल्याचे समजले.
यावेळी विद्यार्थी मनोगतामध्ये कैलास दुपडे, विजयकुमार दुपडे,नितीन दुपडे, सिद्धेश्वर सावंत,लक्ष्मण धोत्रे, मिथून पवार व सौ.रोहिणी भोसले - सावंत यांनी आपल्या इ.१० वी नंतरचे जीवन सर्वांसमोर मांडले.त्यानंतर सर्व गुरूजन वर्गांनी मार्गदर्शन केले त्यामध्ये मुख्याध्यापक श्री.डी.बी.आवताडे व मुख्याध्यापक एस.एन.दुपडे यांनी आपल्या पुढील जीवनामध्ये आरोग्य कसे सांभाळावे व आर्थिक नियोजन कसे असावे हे सांगितले.
त्यानंतर दुपारच्या सत्रात सर्वांनी स्नेह भोजन करून संगीत खुर्चीसारखे खेळ खेळून व उखाने घेऊन आनंद साजरा करून सदरचा दिवस हा अविस्मनीय केला.या स्नेह मेळावा आयोजनासाठी कैलास दुपडे,लक्ष्मण धोत्रे,दत्तात्रय दुपडे,गोपाळ दुपडे यांनी सहकार्य केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजयकुमार दुपडे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा