Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ जून, २०२५

*लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत "प्रवेशोत्सव शिक्षणाचा"आनंदोत्सव साजरा.*

 


*अकलूज ----प्रतिनिधी*

    *शकुरभाई----तांबोळी*

   *टाइम्स 45 न्यूज मराठी

16 जुन 2025 प्रशालेचा पहिला दिवस शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत विद्यार्थिनींचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले.हलगी वादनात,पुष्पवृष्टीच्या वर्षावात ,औक्षण करून विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले .सखी सावित्रीच्या सदस्या सौ अमृता लोखंडे मॅडम , महिला पालक यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती व माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते काकासाहेब व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .विद्यार्थिनींना पेन, चॉकलेट, फुगे व शैक्षणिक पुस्तक संच यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .लोखंडे मॅडम यांनी शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थिनींना सांगितले व शैक्षणिक नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या .प्रशालेच्या उल्लेखनीय बाबी मुख्याध्यापिका सौ पवार मॅडम आपल्या प्रास्ताविकात सांगितले .प्रशालेचा पहिल्या दिवशीचा आनंद विद्यार्थिनीच्या तोंडावर ओसंडून वाहत होता .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ . रचना रणवरे मॅडम यांनी केले .आभार विशाल लिके सर यांनी मानले .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा