*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा ते हंगरगा रस्त्यावरील धोकादायक पुलाच्या पुनर्बांधणीसाठी शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर यांनी- खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याकडे निवेदना
व्दारे मागणी केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की
काक्रंबा ते हंगरगा या महत्त्वाच्या ग्रामीण रस्त्याचा दररोज शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने वापर करतात. सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे शेती मशागत व पेरणीसाठी या रस्त्यावरील वाहतुकीस मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, काक्रंबा गावाजवळील ओढ्यावर असलेला पूल अत्यंत जुना, जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून त्यावरून वाहतूक करताना जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्थानिक शिवसेना नेते चेतन बंडगर व शेतकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित विभागाला लेखी व तोंडी स्वरूपात पूल दुरुस्तीसाठी व नव्याने बांधकामासाठी निवेदने दिली आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्याचे खासदार मा. ओमराजे निंबाळकर यांच्याकडे शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर शिवसैनिक दिपक भिसे व स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी निवेदन देत या धोकादायक पुलाच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शेतकरी बांधवांना सुरक्षित व सुलभ वाहतुकीचा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशीही जोरदार मागणी यावेळी शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर यांनी केली.
शेतकरी हिताचा व ग्रामीण भागाच्या सुरक्षिततेचा विचार करता हा पूल लवकरात लवकर बांधण्यात यावा, अशी जनतेची भावना आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा