*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
सदाशिवनगर ग्राम पंचायत ही पुरंदावडे ग्राम पंचायत मधून 25/8/ 1988 साली विभक्त होऊन स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना झाली.परंतू अजून पर्यंत सदाशिवनगर गावाला गावठाण मिळाले नाही, गावठाण मंजूर होण्यासाठी शासनाकडे वारंवार मागणी करून निवेदन देऊन ही गावठाण मिळाले नाही,गेली 40वर्षीपासून भुमिहीन, शेतमजूर दलीत कुटुंब या जागेत रहात आहेत शेती महामंडळाच्या गट नंबर 41,89,91,120,121,221, या गटाची मागणी गावठाण साठी केलीआहे ,गावास गावठाण नसल्याने कोणतीही शासकीय योजना राबवता येत नाही कुठल्याही शासकीय योजनांचा फायदा होत नाही घरकुल मंजूर असूनसुध्दा जागे अभावी घरकुल बांधता येत नाही सदर गटाची मोजणी करून घेण्यासाठी ग्रामपंचायत ने भुमी अभिलेख कार्यालय माळशिरस याच्याकडे 28500 रूपये भरून सदर गटाची मोजणी करून घेतली आहे , गावाला गावठाण मिळावे म्हणून गेली तीस वर्षांपूर्वी पासून गावठाण संघर्ष समिती,व सदाशिवनगर ग्रामपंचायत यांचे वतीने मोर्चा,,रास्ता रोको, उपोषण,गाव बंद आंदोलन करण्यात आली आहेत
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. जयकुमार गोरे साहेब हे सोलापूर जिल्हा दौऱ्या वरती आले असता सदाशिवनगर येथे स्वागत करून गावठाण मागणीचे निवेदन देताना रिपब्लिकन पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा गावठाण संघर्ष समितीचे अध्यक्ष सोमनाथ भोसले, ग्रामसेवक प्रशांत रूपनवर सुभाष सुज्ञे मदन सुळे राम बनसोडे आप्पा शिंदे योगेश दाभाडे व ग्रामस्थ उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा