Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १८ जुलै, २०२५

*सर्पमित्र आणि डॉक्टरांची कामगिरी सोलापुरात पुन्हा सापाची सर्जरी!* *अबसेस-आजारातून गवत्या साप सुखरुप मुक्त*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

दि. १३ रोजी सायं ७:३० वा दरम्यान जुळे सोलापूर बॉम्बेपार्क येथील रहिवासी गीताश्री हावळे यांनी त्यांच्या घराजवळ एक सर्प निदर्शनास आल्याची खबर निसर्गप्रेमी सर्पमित्र रविचंद्र स्वामी यांना फोन कॉल द्वारे कळवली.

सर्पमित्र रविचंद्र स्वामी हे तात्काळ त्या ठिकाणी पोहचून पाहणी केली असता तेथे गवत्या जातीचा बिनविषारी सर्प आढळून आला. त्या सर्पास सुखरूप रित्या पकडत असताना सर्पाच्या अंगावर व डोक्यावर छोट्या मोठ्या दोन गाठी दिसून आल्या.

या आधी सुद्धा २०२१ साली फेब्रुवारी महिन्यात सोलापूरात सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी पकडलेल्या अश्याच प्रकार च्या गाठी असणाऱ्या गवत्या सापावर ऍनिमल राहत च्या टीम ने राज्यात पहिल्यांदाच यशस्वी शास्त्रक्रिया झाल्याचे सर्पमित्र स्वामी यांच्या लक्षात आले. सर्पमित्र स्वामी यांनी याच अनुषंगाने सर्पमित्र भीमसेन लोकरे यांना सध्या आढळून आलेल्या गवत्या सापाची माहिती दिली. सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी त्या गवत्या सापास अबसेस नावाचा आजार असल्याची खात्री पूर्वक माहिती सांगितली. सर्पमित्र रविचंद्र स्वामी यांनी तात्काळ वनविभागाचे रेस्क्यूवर प्रवीण जेऊरे यांच्याशी संपर्क साधून फॉरेस्ट विभागाशी या बाबतीत कळविण्यात आले व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या सूचनेनुसार त्या आजारी "गवत्या सापास" उपचारासाठी ऍनिमल राहत टीम कडे दाखल केले.

अनिमल राहत चे डॉ आकाश जाधव,भीमाशंकर विजापूरे, गणेश जावीर आदी टीम ने त्या सापास भूल देऊन लगबघ पाऊण तासाच्या वेळात शास्त्रक्रिया करून, सापाच्या डोक्यावरील व अंगावरील दोन अबसेस च्या गाठी यशस्वी रित्या काढले व टाक्या घालण्यात आले. त्या नंतर साप शुद्धीवर येताच सलाईन लावण्यात आले. साप पूर्णपणे बरा होण्यासाठी पुढे तीन दिवसाचा कालावधी लागेल असे डॉ. आकाश जाधव यांनी सर्पमित्र स्वामी यांना सांगितले.

 त्या नंतर आवश्यक खाद्य पदार्थ पुरवून चौवथ्या दिवशी सापाची प्रकृती ठीक होताच हालचाली वाढल्याचे लक्ष्यात येतात त्या सापास निसर्गाच्या सानिध्यात सुखरूप पणे मुक्त करण्यात आले.


 ही मोहीम सोलापूर वनविभाग उपवनसंरक्षक कुलराज सिंग,सहायक वनसंरक्षक अजित शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी रोहितकुमार गंगार्डे ,वनपाल इरफान काझी,वनरक्षक अनिता शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली,

व अनिमल राहत चे डॉ.आकाश जाधव,भीमाशंकर विजापूरे,गणेश जावीर, वनविभागाचे रेस्क्यूअर प्रविण जेऊरे, 

निसर्गप्रेमी सर्पमित्र रविचंद्र स्वामी, निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक सर्पमित्र भीमसेन लोकरे वन्यजीव प्रेमी संस्था सदस्य यश माडे यांच्या वतीने पार पडली.



*काय आहे अबसेस? जाणून घ्या*

 सर्पांना काही कारणाने छोट्या छोट्या जखमा झाल्यास व त्या जखमांमध्ये पू भरल्यास अशुद्ध रक्ताचा साठा होऊन त्याच्या गाठी होतात याला अबसेस आजाराच्या गाठी म्हणतात व त्या मुळे सापांना अत्यंत तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात. पुढे जर यां गाठी वाढून फुटल्यास सापाचा मृत्यूही होऊ शकतो असे डॉ. आकाश जाधव यांनी सांगितले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा