*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
----- उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पुरनियंत्रणासाठी ४१ हजार ६०० क्युसेक्स तर वीरमधून नीरा नदीत ३२ हजार क्युसेक्सचा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नरसिंहपूर येथील संगमावर ७५ हजार क्युसेक्सचा विसर्ग वाहत आहे. तसेच गणेशवाडी पुलाला पाणी चिकटले होते. प्रशासनाने इंदापूर, माढा व माळशिरस तालुक्यातील नदीकाठच्या गावातील शेतकरी व ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
पुणे शहर व परिसरातील धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने जवळपास १९ पैकी १६ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने त्यांचे अतिरिक्त पाणी खाली सोडले जात आहे. त्यामुळे दौंड येथून उजनी धरणात जवळपास ३४ हजार क्युसेक्सचा विसर्ग येवून मिसळत आहे. सध्याला धरण ९७.०२ टक्के भरले असून एकूण पाणीसाठा ११५ टिएमसी झाला आहे. त्यातील ५२ टिएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे भिमा नदीत ४० हजार, विजनिर्मिती १६००, सिनामाढा १८०, दहिगाव उपसा ८०, बोगदा ४०० तर मुख्य कालवा ११०० क्युसेक्सचा विसर्ग सोडला जात आहे. पाठीमागील अनेक वर्षांचा इतिहास पाहता जूलै महिन्यात धरणात एवढा मोठ्या प्रमाणात पाणीसाठा प्रथमच झाला असल्याचे अनेक जुन्या जाणकारांनी बोलताना सांगितले.
उजनी धरणात दौंड येथून ३४ हजार क्युसेक्स एवढा विसर्ग उजनी धरणात येवून मिसळत आहे. त्यामुळे उजनी धरण प्रशासनाने भिमा नदीतले पाणी ३० हजाराने कमी करून ४० हजार क्युसेक्सचा विसर्ग केला आहे. तर विर धरण ९० टक्के भरल्याने नीरा नदीत ३२६६३ क्युसेक्सचा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नरसिंहपूर येथील संगमावर ७५ हजार क्युसेक्सचा विसर्ग वाहत आहे. त्यामुळे प्रशासनाने इंदापूर, माढा व माळशिरस तालुक्यातील शेतकरी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर गणेशवाडी येथील भिमा नदीवरील पुलाला पाणी चिकटले होते. त्यामुळे यावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.
उजनी धरणाची जुलैमध्येच शंभर टक्क्याकडे वाटचाल झपाट्याने सुरू असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. संभाव्य पुरपरस्थिती उद्भवण्या अगोदरच पुरनियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी भीमा नदीच्या काठावर असणाऱ्या आपल्या विद्युत मोटारी, केबल, पाईप अगोदरच सुरक्षित ठिकाणी हलवलेले आहेत. मात्र पावसाने दिड महिन्यापासून पाठ फिरवल्याने पिके पाण्याला आली असल्याने नदी उश्याला अन्न कोरड घशाला अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
भिमा नदीतून लाखो लिटर पाणी वाहून चालल्याचे शेतकऱ्यांना नुसते पहाण्याची वेळ आली आहे. मात्र मागील दिड महिन्यापासून पाऊसाने पाठ फिरवल्याने पिके पाण्याअभावी जळून जाऊ लागली असताना त्यांना नदीचे पाणी विद्युत मोटारी, केबल, पाईप काढून ठेवल्याने देता येत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
फोटो - गणेशवाडी येथे उजनी धरणातून भिमा नदीत सोडलेले पाणी वाहताना दिसत आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा