*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
दिनांक ०८/११/२०१८ रोजी अकलुज येथे पोलीस स्भेशन मध्ये अकलुज गु.र.नं. ५०२/२०१८ अन्वये भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल झाला. यातील मयत सुषमा गणेश टिंगरे तिचे पती गणेश टिंगरे मुले सुष्टी व ओम यांच्यासह श्रीपुर साखर कारखान्याच्या गेटसमोर राहण्यास होती. सुषमा हिच्या तिचा नवरा गणेश चारित्राचा संशय घेवून मारहाण शिवीगाळ करीत होता. त्याच्या शेजारी शौकत मौला मुलाणी राहण्यास आहे. त्याने त्यांचे भांडणे सोडविली होती. त्याने गणेश यास चारित्रांचा संशय घेवू नको असे समजावून सांगितले होते. गणेश याने तिला एकदा चारित्राचा संशय घेवून गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सुषमा यांने तिच्या आई वडिलांकडे निघुन गेली होती. दिवाळी सणासाठी ती मुलांना घेवून परत गणेशाकडे श्रीपुर येथे सणांवारासाठी आली होती. यातील आरोपी गणेश यांने मुलांना खाउ आणण्यासाठी पैसे देवून बाहेर जाण्यासाठी सांगितले. मुले बाहेर गेल्यानंतर दार लावून घ् ोतले. त्यानंतर यातील सुषमा ही मयत अवस्थेत आढळली. यातील गणेश याने शेजारी राहणारे फिर्यादी शौकत मुलाणी यांना स्वतःहून याबाबत सांगितले त्यांची भांडणे नेहमीच होत असल्याने सुरवातीस त्याने दुर्लक्ष केले. यावर यातील आरोपी गणेश याने त्याच्या संपर्कातील इतर तिघांना सुष्मा हिस जिवे ठार मारले आहे असे सांगितले. यानंतर यातील फिर्यादी शौकत मुलाणी यांनी जावून पाहिले असता सुष्मा हि मयत अवस्थेत आढळली. तिच्या कपाळावर टेंगूळ आला होता, गळयावर व्रण होता, डोक्यावर जखमा होत्या असे त्यास आढळले. त्याने अकलूज पोलिस ठाण्याकडे यातील फिर्याद दाखल केली. मयत सुष्मा याच्या डोक्याला गंभीर जखमा शवविच्छेदनावेळी आढळून आल्या. यावर अकलूज पोलिस ठाण्याने भारतीय दंड विधान ३०२ अन्वये सदरचा गुन्हा दाखल केला. संपूर्ण तपास झााल्यानंतर दोषारोपपन्न मे. न्यायालयात दाखल केले.
मे. न्यायालयाने ातील आरोपी गणेश कांतीलाल टिंगरे यांच्यावरती भारतीय दंड विधानाचे कलम ३०२ प्रमाणे दोषारोप ठेवला. यामध्ये अभियोग पक्षाने एकूण १० साक्षीदार मे. न्यायालयासमोर तपासले. यातील फिर्यादी शौकत मौला मुलाणी मयताची मुले सृष्टी गणेश टिंगरे, ओम गणेश टिंगरे, शवविच्छेदन केलेले वैद्यकीय अधिकारी प्रियांका प्रल्हाद सिद यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. यातील इतर साक्षीदारांनीही आरोपी गणेश टिंगरे याने सुष्मा हिस जिवे ठार मारले असल्याबाबत कथन केल्याचे मे. न्यायालयासमोर सांगितले. या सर्वांची साक्ष व अभियोग पक्षातर्फे आलेल्या पुराव्याचे अवलोकन करून श्री एल डी हुलीसो जिल्हा व सत्र न्यायाधीश श माळशिरस यांनी कलम ३०२ प्रमाणे यातील आरोपी गणेश कांतीलाल टिंगरे याला अजन्म कारावासाची शिक्षा सुनावली तसेच रक्कम रु २०००/-व दंड न भरल्यास दोन महिने साधा तुरुंगवास अशी शिक्षा सुनावली यातील आरोपी गणेश कांतीलाल टिंगरे हा गुन्हा केल्यापासून न्यायालयीन कैदेत आहे त्याचा न्यायालयीन कायद्यातील कालावधी गृहीत धरून पुढील शिक्षा भोगावयाची आहे असा मे न्यायालयाने आदेश केला आहे यामध्ये न्यायालयीन पैरवी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल रियाज मकबुल तांबोळी व पोलीस नाईक हरीश आनंदराव भोसले यामध्ये तपास अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश ज्ञानेश्वर माने यांनी दोषारोप पत्र दाखल केले यामध्ये सहा. सरकारी अभियोक्ता म्हणून संग्राम सुभाष पाटील यांनी काम पाहिले व सहा. सरकारी अभियोक्ता एसटी मेंढेगिरी यांनी सहाय्य केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा