Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २७ जुलै, २०२५

*उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या आलेला संदेशांच्या अनुषंगाने भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर यांनी दिला भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे, भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर यांना भीमा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबतचे "उजनी धरण व्यवस्थापन विभाग भिमानगर" यांचे कडून संदेश प्राप्त झाल्याने भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबत चे पत्र

पोलीस अधीक्षक (ग्रामीण), सोलापूर,

तहसिलदार, तहसिल कार्यालय, माळशिरस / माढा / पंढरपूर / मंगळवेढा / मोहोळ / द. सोलापूर आणि 

मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे

उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये विषयांकित प्रकरणी सविनय सादर करण्यात येते की. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चालु असून धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होत आहे. त्यानुषंगाने भीमा नदीमध्ये पूर नियंत्रणासाठी आज दि. २७/०७/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजता उजनी धरणाच्या सांडव्यावरून ३५००० क्यूसेक्स व विद्युत गृहामधून १६०० क्यूसेक्स असा एकूण ३६६०० विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे.


वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रामध्ये ९९८६ क्यूसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला असून उजनी धरणातील ३६६०० व वीर धरणातील ९९८६ असा एकत्रित ४६५८६ क्सूसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये राहणार आहे.

पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवक (Inflow) नुसार विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता आहे.

तरी नदी काठांवरील गावांना व नागरिकांना आपले स्तरावरून सतर्कतेचा इशारा देणेबाबत तसेच आवश्यक उपाययोजना करणेबाबत विनंती केली आहे 


 आपले माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर.

(प्रा.मु.पाटील) उप कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर यांनी कळवलेआहे

  *माहितीस्तव प्रत*

प्रतः- मा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सोलापूर यांना माहितीसाठी सविनय सादर.


प्रतः-मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर यांना माहितीसाठी सविनय सादर.


प्रतः- उपविभागीय अधिकारी, पंढरपूर यांना माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर.


प्रतः-सहायक अभियंता श्रेणी-१, भीमा विकास उपविभाग क्र. २. पंढरपूर यांना माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी.


प्रतः- उपविभागीय अधिकारी, भीमा विकास उपविभाग क्र.४, श्रीपूर यांना माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी.




प्रतः- उपविभागीय अधिकारी, उजनी कालवा उपविभाग क्र.५२, मंगळवेढा यांना माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा