उपसंपादक -नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
- भारतरत्न, माजी राष्ट्रपती डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीचे आैचित्य साधून साहित्यिक इंद्रजीत पाटील यांना सन्मानित करण्यात आले.डाॅ.कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांचा गाैरव करण्यात आला.हा पुरस्कार त्यांना त्यांच्या एकूण साहित्यिक कामगिरी विषयी देण्यात आला.ड्रीम फाऊंडेशन, साेलापूर या संस्थेने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली.वैज्ञानिक डाॅ.अशाेक नगरकर,पाेलिस आयुक्त एम.राजकुमार,पाेलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी,मा.सहा.आयुक्त,अध्यक्ष,सेवा फाऊंडेशनचे श्री.प्रकाश राठाेड,म्हाडाचे वित्त नियंत्रक अजयसिंह पवार,प्रा.व्यंकटेश गंभीर,प्रकाश राठोड,एम.के.फाऊंडेशनचे संस्थापक एम.के.काेगनुरे,श्री.प्रा.व्ही.एस.अंकलकाेटे-पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल,मानाचा फेटा,पुस्तके व राेप असे पुरस्काराचे स्वरूप हाेते.ड्रीम फाऊंडेशनचे सर्वेसर्वा श्री.काशिनाथ भतगुणकी सर,समन्वयक संगिता पाटील भतगुणकी व त्यांचे कार्यकर्ते यांनी या साेहळ्याचे उत्तम नियोजन केले हाेते.हा पुरस्कार विशेषतः जीवनाचा उपासक - कर्मवीर लाेहाेकरे गुरूजी या चरित्रग्रंथासाठीच देण्यात आला.हा पुरस्कार व्दारकाधीश मंदिर,जलाराम मार्ग,विजापूर राेड या ठिकाणी इंद्रजीत पाटील यांना प्रदान करण्यात आला.ग्रामीण भागातील या हरहुन्नरी साहित्यिकाची साहित्य क्षेत्रातील कामगिरी पाहून श्री.पंडितराव लाेहाेकरे,माधवराव कुतवळ,प्रकाश सकुंडे गुरूजी,चंद्रकांत पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,जीवराज गरड यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा