*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
-----संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. त्यानंतर आरती करण्यात आली. सराटीचा मुक्काम संपवून पालखी अकलूजकडे लाखो वैष्णवांच्या साक्षीने मार्गस्थ झाली. जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाने पालखी सोहळ्यास निरोप दिला. तर सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर प्रशासनाच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले.
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी च्या पादुकांना सकाळी सात वाजता जालींधर मोरे महाराज, दिलीप मोरे, लक्ष्मण मोरे, गणेश मोरे, वैभव मोरे, विक्रम मोरे, उमेश मोरे यांनी परंपरेप्रमाणे नीरा नदीच्या पाण्याने शाही स्नान घातले. त्यानंतर नदीतच हजारोंच्या संख्येने जमलेल्या वैष्णवांच्या साक्षीने समाज आरती करण्यात आली.
भक्तांच्या व वारकऱ्यांच्या दर्शनासाठी पादुका सराटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ठेवण्यात आले होते. यावेळी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड, तहसीलदार जिवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, सरपंच अनिशा तांबोळी, उपसरपंच संतोष कोकाटे आदींनी दर्शन घेऊन पादुकांना पुणे जिल्ह्यातून सन्मानपूर्वक निरोप दिला. पालखी सोहळा प्रमुखांच्या वतीने प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचा फेटा, शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.
पालखी सोहळा सकाळी आठ वाजता पुणे जिल्ह्यातून नीरा नदीवरील पुलावरून लाखो वैष्णावांच्या व भक्तांच्या साथीने ग्यानबा तुकाराम, ग्यानबा तुकारामच्या जयघोषात सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे मार्गस्थ झाला.
संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीच्या खळाळत्या पाण्याने स्नान घातले. पालखीने पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करूनही पाऊसाने हुलाकावणी दिली. यावर्षी पावसामुळे पालखीतील वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असूनही शिस्तीचे ज्वलंत उदाहरण बघावयास मिळाले. तर पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.
फोटो - सराटी ( ता इंदापूर ) येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पादुकांना विधीवत नीरा नदीच्या पाण्याने शाही स्नान घालण्यात आले. समाजआरती व महापुजा करण्यात आली.
...............................................................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा