Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १ जुलै, २०२५

*अकलूज येथील कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये पालखी सोहळ्या निमित्त आरोग्य तपासणी शिबिर संपन्न*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित कॉलेज ऑफ फार्मसी, अकलूज व राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या सोबत येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आले.    

       या कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व अक्कासाहेब यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे प्र.कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे,विद्यापीठ

व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिन गायकवाड,डॉ.केदारनाथ काळवले,शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर,वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरज एकतपुरे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, माळेवाडी मधील आरोग्य विभागाच्या डॉ.सौ.देशमुख व आशा सेविका सौ.हिरवे उपस्थित होते.

          कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अनिल भानवसे यांनी सर्व मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले.हे शिबिरास लागणारी औषधे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचे तर्फे महाविद्यालयास देण्यात आली.

        कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,कॉलेज ऑफ फार्मसी अकलूज कडून राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.यापुढे विद्यापीठ आणि कॉलेज ऑफ फार्मसी अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी विद्यापीठाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.शिबिरामध्ये वारकरी भाविकांचे आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले.

     या उपक्रमाचे शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील,संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील,महाविद्यालय विकास समितीचे सभापती विनोदकुमार दोशी व सर्व सदस्य, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील यांनी कौतुक केले. 



शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल भानवसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.हे शिबिर यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनाचे सर्व विद्यार्थी, प्रथम वर्ष बी.फार्मसीचे विद्यार्थी,राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.स्वप्निल राजे घाडगे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा