*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेचे संस्थापक,अध्यक्ष मा. पिराजी थाेरवडे सरांच्या वाढदिवसाचे आैचित्य साधून साहित्यिक इंद्रजीत पाटील यांना स्वाभिमानी राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.हा पुरस्कार त्यांच्या कळ पाेटी आली आेठी या परिपूर्ण अष्टाक्षरी कवितासंग्रहास देण्यात आला.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप हाेते. हा पुरस्कार त्यांना सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्राप्त डाॅ.संजय पुजारी,आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व्यंगचित्रकार व ज्येष्ठ पत्रकार मा.अशाेकजी सुतार,उदघाटक कवी,लेखक,प्रकाशक मा.विक्रम शिंदे,स्वागताध्यक्ष कवी,लेखक मा.सत्यवान मंडलिक,मा.दशरथ पवार,मा.टी.जी.जाधव,मा.आर.ए.ताशिलदार साहेब,मा.प्रशांत व्हटकर साहेब या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात आला.कवी,लेखक इंद्रजीत पाटील यांना यावर्षीचा हा २० वा पुरस्कार असून त्यांना आत्तापर्यंत एकूण ३५ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.सदर पुरस्कार यशवंतराव चव्हाण स्मृती सदन,कराड या ठिकाणी त्यांना सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला.त्याबद्दल प्रकाश सकुंडे गुरूजी,पंडितराव लाेहाेकरे,चंद्रकांत पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,जीवराज गरड यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा